अश्रू अनावर .. पाणवलेल्या डोळ्यांनी बाप्पांना निरोप.
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
वैजापूर तालुक्यासह शहरांमध्ये रात्री दहा वाजेपर्यंत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली ढोल ताशे वाद्य डीजे यांसह सांस्कृतिक कार्यक्रम देखील करण्यात आले आपल्या गणपती बाप्पांना शेवटचा निरोप अगदी पाणवलेले डोळे अश्रू अनावर झाले छोट्या छोट्या मुलांनी देखील आपल्या वडिलांसोबत अगदी लहानपणा सारखी भांडण करून बाप्पांना न जाऊ देण्याचा खूप प्रयत्न केला माझ्या बाप्पांना कुठे घेऊन चालले अशा पद्धतीचे वाक्य देखील लहान मुलांच्या तोंडून ऐकण्यात आले. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. आपल्या कुटुंबासोबत सर्व भाविकांनी मन भावी गणपती बाप्पांचे दर्शन घेतले व गणपती बाप्पांचा शेवट दर्शन .अशा पद्धतीने भाविकांनी आपल्या बाप्पांना आज शेवटचा निरोप देण्यात आला.