Advertisement

पाचोरा :  पाचोरा पदमवंशिय तेली समाजाचा हळदी कुंकू स्नेह मिलन सोहळा उत्साहात साजरा

पाचोरा :- पाचोरा पदमवंशिय तेली समाजाचा हळदी कुंकू स्नेह मिलन सोहळा उत्साहात साजरा

पाचोरा :- रविवार 1 फेब्रुवारी 2025 रोजी नाथ मंदिर जारगाव येथे हळदी कुंकू स्नेह मिलन कार्यक्रम उत्साहात पार पडला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य कमिटी तेली समाज सचिव राजेंद्र ढाकरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्रा के आर चौधरी सर,प्रमुख अतिथी पाचोरा तेली समाज अध्यक्ष सुभाष राठोर,उपाध्यक्ष कांतीलाल माहोर,डॉ पी एस झेरवाल, डॉ जे टी तेली,डॉ प्रदिप नैनाव,डॉ प्रशांत तेली,रोटरी क्लब पाचोरा भडगाव अध्यक्ष डॉ मुकेश तेली मंचावर उपस्थित होते.समाजातील उपस्थित महिला सदस्यांना सौ शीतल प्रदिप नैनाव यांनी वाण वाटप केले. कार्यक्रमाचे अन्नदाते प्रा के आर चौधरी सर,विशाल चौधरी सर,संदीप चौधरी सर हे होते. समाजातील उल्लेखनीय यश प्राप्तीबद्दल जवळपास चाळीस विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला.डॉ प्रशांत तेली यांच्या सौजन्याने सर्व यशस्वीतांना ट्रॉफी भेट देण्यात आल्यात.यावेळी समाजाच्या नविन कार्यकारणीची निवड करण्यात आली. नुतन अध्यक्ष म्हणून सुनील आगवाल सर,उपाध्यक्ष गजानन तेली,सचिव प्रा अमोल झेरवाल सर,कार्याध्यक्ष डॉ प्रशांत तेली,सहसचिव हेमंत तेली,कोषाध्यक्ष रघुनाथ चौधरी यांची निवड करण्यात आली.यावेळी डॉ प्रशांत तेली, डॉ मुकेश तेली यांनी समाजपयोगी मार्गदर्शन पर भाषण केले.कार्यक्रमाच्या शेवटी प्रा राजेंद्र सर यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक सुनील परदेशी सर यांनी तर सूत्रसंचालन जगदीश राठोड सर ! केले.सदर कार्यक्रमांस समाजातील जवळपास 250 लोक उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!