प्रतिनिधी सुधीर गोखले
बहुचर्चित स्मार्ट मीटर अर्थात स्मार्ट मीटर टी ओ डी या योजनेचा सातारकर नागरिकांना चांगला फायदा झाला आहे केवळ जून महिन्यामध्ये महावितरणच्या सातारा मंडळातील २ लाख ३९ हजार घरगुती ग्राहकांनी कमी कालावधी मध्ये ५३ लाख ६४ हजार युनिटचा दिवसा वापर केल्याचे समोर आले आहे. या वापरकर्त्या ग्राहकांनी आपल्या विद्युत बिलामध्ये ४५ लाख ५९ हजार रुपयांची घसघशीत बचत केल्याचे दिसून येत आहे. महावितरण सध्या हे स्मार्ट मीटर टी ओ डी अर्थात हि एक ऑनलाईन प्रणाली आहे ज्यामध्ये वापरकर्त्या ग्राहकाला आपण नक्की किती वीज वापरतो हे ऑनलाईन आपल्या मोबाईल मध्ये महावितरणच्या विशेष ऍप द्वारे दिसते. तसेच हे मीटर मोफत बसवून देण्यात येत आहे. मात्र काही गैरसमजामुळे सद्य स्थितीमध्ये विद्युत ग्राहकांमध्ये या मीटर बाबत खूप गैरसमजुती आहेत त्याही महावितरणचे अधिकारी ठिकठिकाणी कॅम्पघेऊन ग्राहकांचे समाधान करत आहेत. या योजनेअंतर्गत सकाळी ९ ते सायंकाळी ५ यता वेळेत वापरलेल्या विजेसाठी प्रतियुनिट ८५ पैसे इतकी सवलत मिळत आहे. याबाबत सांगलीचे कार्यकारी अभियंता आशिष मेहता म्हणाले, विद्युत ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरण ने हे मीटर अगदी सुयोग्य पद्धतीने वितरित करण्याचे योजले आहेत. या मीटरच्या आधुनिक पद्धतीमुळे वीज चोरी किंवा मीटर मधील मानवी हस्तक्षेप टाळला आहे. ग्राहकांना त्यांच्या मोबाईल वर दैनंदिन विजेचा वापर हा लाईव्ह समजत असल्याने खूप मोठी वीज बचत स्वतः विद्युत ग्राहकांकडून होत आहे. .
Leave a Reply