Advertisement

अलमट्टी ७६ टक्के भरले; वारणा, कोयना धरणक्षेत्रात संततधार सुरूच; कोयना ५७.१७ टीएमसी; कृष्णाकाठच्या गावांची धाकधूक वाढली

प्रतिनिधी सुधीर गोखले

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याना महापुराच्या दृष्टीने चिंता करणारे धारण म्हणजे कर्नाटकातील अलमट्टी रविवारी रात्री पर्यंत हे धारण ७६ टक्के भरले असून वारणा आणि कोयना धारण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. या दोनही धरणाच्या पाणी पातळी मध्ये झपाट्याने वाढ होतेय. कोयना धरणाची पाणी पातळी ५७.१७ टीएमसी झाली असून नवजा आणि महाबळेश्वर मध्ये सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे धरणामध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. अलमट्टी धरणाची साठवण क्षमता १२३ टी एम सी इतकी असून रविवार पर्यंत धरणामध्ये ९७ टी एम सी इतकी पाण्याची नोंद झाली. तर कोयना धरणाने आपली पन्नाशी पार करत साठीच्या जवळपास आकडा गाठला आहे. तर वारणा धरणही ६५ टक्के भरले आहे. शिराळा तालुक्यातही पावसाने जोरदार कमबॅक केले आहेत तसेच वाळवा मिरज पलूस कडेगाव अंबानी तासगाव तालुक्यामध्ये बहुतांशी भागात मान्सूनच्या सरी अधूनमधून हजेरी लावत आहेत. यंदा अल निनो मुळे मान्सुन च्या पावसावर परिमाण झालेला दिसून येत आहे. यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहे.. गेल्या दीड महिन्यांमध्ये जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ७८ टक्के पासून पडला आहे. मात्र सध्या पडत असलेल्या पावसाने खरीप हंगामातील पेरण्यांना वेग मिळाला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पुढील काही दिवस असाच पावसाचा जोर राहिल्यास धरणाच्या सांडव्यावरून पाणी नदीपात्रात सोडले जाण्याची शक्यता आहे. सध्याचे पाऊसमान पहाता महापूर टाळायचा असेल तर आतापासून अलमट्टी धरण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याची गरज असल्याचे मत काही निवृत्त अभियंत्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!