Advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जनसुराज्य चे प्रदेशाध्यक्ष समित कदम मित्र समूहातर्फे १लाख पाणी बाटल्यांचे आज वारकऱ्यांना वाटप

प्रतिनिधी सुधीर गोखले

मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस हे नाव राजकारणामध्ये सर्वांचे लाडके देवभाऊ म्हणून प्रसिद्ध आहे. यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे निकटवर्ती आणि महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आणि मित्रसमूहातर्फे आज वारकऱ्यांना एक लक्ष पाण्याच्या बाटल्याचे वितरण होणार असल्याची माहिती नगरसेवक डॉ पंकज म्हेत्रे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली ते म्हणाले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचेच देवभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज आमचे नेते समित दादा यांच्या संकल्पनेतून एक लाख पाणी बॉटल वाटपाचा हा कार्यक्रम आयोजित करत आहोत. मिरज आणि पूर्व भागातील तसेच पश्चिम भागातील समित दादा यांचे सर्व सहकारी, पक्षाचे पदाधिकारी आज या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये आषाढी वारीची हि सर्वात वेगळी परंपरा असून विठुराया चरणी मुख्यमंत्री देवभाऊंना दीर्घायुष्य मिळावे यासाठी जनसुराज्य शक्ती पक्षातर्फे विनम्र प्रार्थना.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!