Advertisement

‘नशामुक्त सांगली’ साठी मिरजेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सरसावले; जिल्हा पोलीस दल आणि रुग्णालय प्रशासन यांच्या प्रबोधनात्मक फलकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले अनावरण


सांगली जिल्हा पोलीस दल आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने एक विशेष माहिती देणाऱ्या फलकाचे अनावरण नुकतेच पालकमंत्री ना चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ मैनाक घोष, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ प्रकाश गुरव डॉ रुपेशकुमार शिंदे, सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी तसेच आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हा नियोजन समिती सदस्य दिपकबाबा शिंदे म्हैसाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता डॉ प्रकाश गुरव तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ रुपेशकुमार शिंदे यांच्या संकल्पनेनुसार महाविद्यालयाच्या आवारामध्ये कोठेही तंबाखू तसेच नशा येणारे तत्सम पदार्थ खाण्यास किंवा बाळगण्यास पूर्वीपासूनच बंदी आहे मात्र सध्या पालकमंत्र्यांच्या संकल्पनेनुसार या महाविद्यालयामध्ये जरी कोणी अशा प्रकारे गैर वर्तन करताना वाढलाच तर त्याला शिक्षा हि होणारच असल्याचे अधीक्षक डॉ रुपेशकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले सध्या आमच्या रुग्णालय आणि महाविद्यालयाच्या आवारात कोणताही रुग्ण किंवा त्यांच्या संबंधित रुग्णांचे नातेवाईक हे जर अशा शासनाने बंदी घातलेल्या गोष्टी बाळगताना आढळून आल्या तर आम्ही तातडीने पोलीस प्रशासनाला याही कल्पना देणार आहोत तसेच पोलीस दलाच्या माध्यमातूनही या आमच्या आवारात अशा प्रकारच्या गोष्टीवर लक्ष ठेवले जाईल.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!