बहुचर्चित वारणाली येथील महापालिकेचे मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाच्या खाजगीकरणाचा वाढता विरोध लक्षात घेता आमदार सुधीर गाडगीळ यांनी अखेर आपले मौन सोडत या रुग्णालयाचे खाजगीकरण होणार नसल्याचा निर्वाळा दिला. महापालिकेच्या आयुक्त कार्यालयामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. ते म्हणाले हे रुग्णालय महापालिका चालवेल. समुद्रा कंपनी सोबत केलेला करार संपवला जाईल. यासाठी मनपा प्रशासन शासनाचे कायदेशीर मार्गदर्शन घेईल. सध्या महापालिकेच्या घरपट्टी विभागाचा मुद्दा जो चर्चेत आहे याविषयी त्यांनी समर्थन दाखवत जवळजवळ नव्वद टक्के नागरिक सध्या आलेल्या घरपट्टी बाबत समाधानी असल्याचे चित्र आहे. असा दावा त्यांनी यावेळी केला. तीनही शहरांच्या विकासासाठी नागरिकांनी घरपट्टी आणि पाणीपट्टी वेळच्या वेळी भरावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी एक प्रकारे त्यांनी भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी आकारणी बाबत समर्थन दर्शवले. आमदार गाडगीळ यांनी मंगळवारी महापालिकेच्या कामाचा आढावा घेतला यावेळी त्यांनी आयुक्तांसह भाजप नगरसेवक यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. आमदार गाडगीळ म्हणाले एकदा हे रुग्णालय चालवायला दिले कि ते कधी परत येत नाही त्यामुळे एकदा गेले कि गेले महापालिका ते स्वतः चालवेल. या मल्टी स्पेशालिटी रुग्णालयासाठी शासनाने २५ पदे मंजूर केली आहेत. त्यामुळे लवकरच हे रुग्णालय नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होईल. ज्या नागरिकांनी घरपट्टी बाबत हरकती नोंदवल्या आहेत त्यांच्या मालमत्ता परत एकदा तपासण्यात येतील मोजमापे घेण्यात येतील. महापालिकेच्या वादग्रस्त समुद्रा कंपनीसोबत असलेला स्मार्ट एल इ डी बाबतच्या करारासाठी शासन स्तरावर मार्गदर्शन मागवण्यात येत आहे. हा करार रद्द करण्याच्या हालचाली सुरु असून कंपनीला रक्कम दिली जाईल आणि कंपनीला बाजूला केले जाईल. कुपवाड शहरातील रस्ते ड्रेनेज कामामुळे खराब झाल्याने याबाबत डीपीआर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. या खराब रस्त्यांसाठी शासनाकडे निधीसाठी प्रयत्न सुरु आहेत. जवळ जवळ ५१ कोटी रुपये इतका निधीचा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे. मंजुरी साठी पाठपुरावा सुरु आहे. शेरीनाल्या बाबत देखील मुख्यमंत्री देवेंद्रजी सकारात्मक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. लवकरच शासन स्तरावर हा प्रश्न सुटणार आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.Website: http://satyarath.com/wp-admin
Leave a Reply