आज रोटरी क्लब तर्फे एक अनोखा उपक्रम संपन्न झाला तो म्हणजे सायकल बँकेचा… होय आपल्याला बँक म्हणले कि पैसे भरणे आणि काढणे हा व्यवहार माहिती आहे मात्र मिरजेतील रोटरी क्लब ने सायकल बँकेचा हा अनोखा उपक्रम राबवून एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे आज एका विशेष कार्यक्रमांमध्ये मिरजेतील रोटरी क्लबने या अनोख्या उपक्रमाची सुरुवात केली. उपायुक्त स्मृती पाटील यांच्या हस्ते या सायकली मुला मुलींना प्रदान करण्यात आल्या यावेळी रोटरी क्लब चे पदाधिकारी प्रा डॉ रवींद्र फडके यांनी अधिक माहिती देताना सांगितले कि आम्ही हि संकल्पना विशेष करून ग्रामीण भागातील गरजू आणि गोरगरीब शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थीनींसाठी राबवत आहोत या संकल्पनेनुसार ग्रामीण भागातील काही शाळा व्यवस्थापनाबरोबर आमची चर्चा झाली नरवाड म्हैसाळ आणि मिरजेतील शाळा आम्ही निवडल्या त्यातील शालेय मुले मुली आम्ही निवडल्या शाळे बरोबर आम्ही सायकल बँकेची संकल्पने बाबत चर्चा केली आम्ही आणि शाळा व्यवस्थापन असे एकत्रित पणे सायकली विकत घेतल्या या सायकली आम्ही आज या मुला मुलींना देत आहोत मात्र या सायकली त्यांच्या शैक्षणिक वर्षापुरत्या मर्यादित वापरासाठी असणार आहेत त्यानंतर त्या सायकली त्या त्या मुला मुलींनी व्यवस्थित दुरुस्ती करून परत शाळांमध्ये जमा करायच्या आहेत म्हणजे पुढील वेळेस पुढच्या मुला मुलींना त्या वापरण्यासाठी उपलब्ध होऊ शकतात. या प्रमाणे आज आम्ही सुमारे शेकडो सायकलींचे वाटप करत असल्याचे त्यांनी सांगितले या सायकली विकत घेण्यासाठी शाळा व्यवस्थापन आणि आमच्या रोटरी क्लबतर्फे रक्कम एकत्रित केली आहे त्यानुसार आज दि हिंद एज्युकेशन सोसायटी संचलित नरवाड येथील शाळेतील मुला मुलींना या सायकली देण्यात आल्या त्याच प्रमाणे म्हैसाळ येथील शाळेतील मुला मुलींना सायकली देण्यात आल्या आणि मिरजतील उर्दू शाळेतील मुला मुलींना सायकली देण्यात आल्या आहेत. आज झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमामध्ये नेहमी सत्यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या लढणाऱ्या मिरज शहर पत्रकार संघातील पत्रकार बंधूना रेनकोटचे वाटप करण्यात आले तसेच उपायुक्त स्मृती पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये मिरज शहरामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी रोटरी क्लब चे व्हाईस गव्हर्नर कायदेतज्ज्ञ बाळासाहेब जाधव रोटरी, अध्यक्ष उद्योजक सिद्धार्थ मजती, उद्योजक ज्ञानेश्वर सावंत, कंपनी सेक्रेटरी अभय गुळवणी, श्री व सौ प्रा डॉ रवींद्र फडके, उद्योजक गिरीश लांडगे, कल्पतरु कॉलनी चे तानाजी ओमासे, दि हिंद एज्युकेशन सोसायटीचे राहुल साळुंखे, मिरज शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि सी न्युज चे प्रतिनिधी अरुण लोंढे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पत्रकार नागरिक उपस्थित होते. मिरज शहर पत्रकार संघातर्फे ज्येष्ठ पत्रकार धनंजय पाठक यांनी आभार मानले.Website: http://satyarath.com/wp-admin
Leave a Reply