Advertisement

सांगली मिरजेतील रस्त्यावर आता २४ तास धावणार बिट मार्शल; अधीक्षक तुषार दोषी यांच्या हस्ते झाले उदघाटन

काही दिवसांपूर्वी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन शर्मा हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना २४ तास बिट मार्शल ची संकल्पना त्यांनी बोलून दाखवली होती त्याप्रमाणे आज पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या हस्ते या विशेष बिट मार्शल प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस दलाने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या संकल्पनेनुसार सांगली आणि परिसरात १० आणि मिरज आणि परिसरात १० असे एकूण २० बिट मार्शल जोड्या अद्ययावत मोटारसायकल वरून कार्यरत राहणार आहेत. प्रत्येक दुचाकीवर संबंधित पोलीस ठाण्यातील एक अंमलदार आणि दंगल नियंत्रण पथकातील एक कर्मचारी असेल हे बिट मार्शल सकाळी ९ ते रात्री ९ तसेच रात्री ९ ते सकाळी ९ अशी सेवा बजावतील. ज्यावेळी हे त्यांना नेमून दिलेल्या भागात गस्त घालतील त्यावेळी त्यांच्या गाडीवरील लावलेला सायरन सुरु राहील त्यांच्या बरोबर वॉकी टॉकी पंचिंग मोबाईल आणि सायरन दिवे असतील. यामुळे संबंधित ठिकाणी गस्त घालत असताना गुन्हेगारी रोखण्यात मदत होणार असल्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी यावेळी सांगितले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!