मिरजेतील मध्यवर्ती चौक असणारा महात्मा गांधी चौक नेहमी गजबजलेला असतो. या मुख्य चौकातून एक महामार्ग जातो त्यामुळे एस टी बसेस खाजगी बसेस आणि इतर चार चाकी आणि दुचाकी वाहनांची वःतूनमिनिटा मिनिटाला होत असते. चौकातून पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वानलेस हॉस्पिटल अगदी चौक लगत आहे आणि या ठिकाणी हा रस्ता तुलनेने अरुंद आहे तरीही या महामार्गावर डिव्हायडर बसवल्याने हा रस्ता आणखी अरुंद झाला आहे. त्यात मनपा आणि वाहतूक शाखेने सिग्नल यंत्रणा बसवल्याने तर वाहनांची रोजची तोबा गर्दी असते. प्रभाग तीन चे नगरसेवक सागर वनखंडे यांनी काही दिवसापूर्वी मिरज शहर वाहतूक पोलिसांना या वाहतूक समस्येबाबत निवेदन दिले होते त्याप्रमाणे नुकतेच रुजू झालेले वाहतूक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे यांनी मनपा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता टी डी पवार यांच्यासह या चौकाची आणि रहदारीची पहाणी केली यावेळी नगरसेवक सागर वनखंडे यांनी काही सूचना मांडल्या या रस्त्यावरील नव्याने काही अतिक्रमणे असल्यास ती काढली जावीत तसेच रस्त्यावरील खड्डे मुजावण्यात यावेत आणि सिग्नल यंत्रणेबाबत चर्चा झाली. आधीच रस्ते अरुंद असल्याने सिग्नल यंत्रणा सुरु झाली कि अधिकच वाहतूक कोंडी होत असल्याची नागरिकांमधून चर्चा आहे. यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे यांनी आपण समन्वयातून योग्य मार्ग काढू असे आश्वासन दिले.Website: http://satyarath.com/wp-admin
Leave a Reply