Advertisement

आमच्या नावे बनावट सह्या आणि मिरज सुधार समिती कार्यकारिणी सदस्यांची फसवणूक: आमच्या बोगस सह्या करून समिती ची स्थापना: शकील पिरजादे

मिरज सुधार समितीचे संस्थापक अध्यक्ष ऍड अल्लाबक्ष काझी यांनी मिरज सुधार समिती या संस्थेची कार्यकारिणी धर्मादाय आयुक्त यांचेकडे नोंदणी करत असताना आमच्या बोगस सह्या आणि अंगठे यांचा वापर केल्याचा खळबळजक आरोप समिती सदस्य शकील पिरजादे संतोष माने आणि बाळासाहेब पाटील यांनी केला तसेच यासंबंधी मिरज शहर पोलिस ठाण्यात अल्लाबक्ष काझी यांच्या विरोशी तक्रार देखील आज त्यांनी दाखल केली आहे. काही दिवसापूर्वी मिरजेतील अस्लम काझी यांची अल्लाबक्ष काझी यांनी जमीन व्यवहारात बोगस दस्त नोंदणी करून फसवल्याची तक्रार अस्लम काझी यांनी दाखल केली होती त्यानंतर अल्लाबक्ष काझी यांच्या विरोधात मिरज शहरात फसवणूक झालेल्यांच्या तक्रारींचा ओघ वाढत असतानाच आज खुद्द समिती सदस्यांनीअल्लाबक्ष काझी यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात धाव घेतल्याने या प्रकरणात आता तक्रारीची संख्या वाढली आहे

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!