माऊली फाऊंडेशनचा ‘माऊली प्रेरणा पुरस्कार’ उद्योजक सतीश माळी यांना प्रदान: आमदार गोपीचंद पडळकर आणि डॉ रवींद्र अरळी यांच्यासह राज्य मराठी पत्रकार संघाचे संघटक संजयजी भोकरे यांची विशेष उपस्थिती
मिरजेतील माऊली प्रतिष्ठान चा माऊली प्रेरणा पुरस्कार यंदा प्रसिद्ध उद्योजक सतीश माळी यांना एका खास सोहळ्यात प्रदान करण्यात आला भाजप चे जत विधानसभा मतदार संघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार उद्योजक सतीश माळी यांनी स्वीकारला. या विशेष कार्यक्रमानिमित्त राज्य मराठी पत्रकार संघाचे संघटक मार्गदर्शक आणि शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्री अंबाबाई तालीम संस्थेचे कुटुंबप्रमुख संजयजी भोकरे यांच्यासह जत नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ रवींद्र अरळी तसेच सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या उपायुक्त श्रीमती स्मृती पाटील ज्येष्ठ धन्वंतरी डॉ विनोद परमशेट्टी नगरसेवक गणेश माळी आदी मान्यवर उपस्थित होते. उद्योजक सतीश माळी यांनी सामाजिक आणि ओद्योगिक क्षेत्रामध्ये दिलेल्या विशेष योगदानाबद्दल त्यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात येत असल्याचे माऊली फाऊंडेशन चे डॉ सूर्यकांत व्हावळ यांनी सांगितले तर आजच्या या कार्यक्रमानिमित्त माऊली प्रतिष्ठान ने एक सामाजिक भान जोपासले असून वारी निमित्त त्यांचे वारकरी संप्रदाया ची सेवा ही आम्ही पाहिली आहे त्यांचा हा सेवाभाव कायम असाच राहो असे मनोगत आमदार गोपीचंद पडळ कर यांनी व्यक्त केले. या प्रसंगी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.
Leave a Reply