पाचोरा :- पाचोरा बुऱ्हानी शाळेतील 400 बालकांची मोफत आरोग्य तपासणी : रोटरी चा उपक्रम

पाचोरा —–
रोटरी क्लब पाचोरा भडगाव तर्फे दिनांक 28 जुलै रोजी शहरातील बुऱ्हानी इंग्लिश मीडियम स्कूल मधील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शहरातील 16 नामांकित बालरोग तज्ञ, मुख व दंत चिकित्सक यांनी एकत्रितपणे येऊन इयत्ता 1 ली ते 4 थी च्या 400 बालकांची तपासणी केली. छत्रपती संभाजी नगर वसाहत मधील नवीन बुऱ्हानी शाळेच्या प्रांगणात शिबिराचा उद्घाटन समारंभ झाला. याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे, प्रशासन सेक्रेटरी डॉ. स्वप्निल पाटील प्रकल्प सेक्रेटरी डॉ. प्रशांत सांगडे, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. अमोल जाधव, उपाध्यक्ष डॉ. अजयसिंह परदेशी, संजय कोतकर, चंद्रकांत लोढाया, पिंकीताई जिनोदिया, संजय पाटील, गिरीश दुसाने, बुऱ्हानी संस्थेचे अध्यक्ष हातिम भाई बोहरी, सेक्रेटरी मोहम्मद भाई बोहरी, स्कूल कमिटी चेअरमन ताहेरभाई कपाशी, व्हाईस चेअरमन मुस्तफा लकडावाला, प्रशासकीय अधिकारी बी. एन. पाटील, शाळेचे प्राचार्य, उपप्राचार्य उपस्थित होते.
“खालील तज्ञ डॉक्टरांचे प्रमुख योगदान”
डॉ. अमोल पाटील, डॉ. ग्रीष्मा पाटील, डॉ. रोहित तावरे, डॉ. अनुराधा तावरे, डॉ. किरण राजपूत, डॉ. आनंद जैन, डॉ. सचिन चौधरी, डॉ. मुकेश तेली, डॉ. उमेश राठोड, डॉ.सिद्धांत तेली, डॉ. राहुल काटकर . डॉ. शुभेच्छा खिंवसरा, डॉ. जागृती सोनवणे, डॉ.शर्वरी तकाटे, डॉ. आदिती पाटील, डॉ. तेजस्विनी पाटील. बुऱ्हानी शाळेतर्फे सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. स्वप्निल पाटील, यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. अमोल जाधव बालकांना ओघवत्या शैलीत दात स्वच्छता व उत्तम आरोग्य बाबत सूचना दिल्या. उपस्थित दंतरोग तज्ञांकडून बालकांना मोफत टूथब्रश वितरित करण्यात आले. आरोग्य समस्या जाणवलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी प्रिस्क्रीप्शन वर सूचना नोंदवण्यात आल्या. रोटरी तर्फे डॉ प्रशांत सांगडे व शाळेतर्फे बी एन पाटील सर यांनी आभार मानले. विद्यालयाच्या पर्यवेक्षिका अस्मिता पाटील, मुख्याध्यापिका भगवती राऊत यांचे सह सर्व शिक्षक – शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.






Leave a Reply