
प्रतिनिधी सुधीर गोखले
आज गुरुपौर्णिमा… अर्थात गुरु आणि शिष्य नाते जपण्याचा दिवस आजच्या दिवसाला सर्वच क्षेत्रातील शिष्य आपल्या आयुष्यात त्या त्या क्षेत्रामध्ये आपल्याला दिशा दाखवणाऱ्या किंवा योग्य मार्ग दाखवणाऱ्या आपल्या गुरूचे स्मरण करत असतो मग ते आपले आई वडील असोत किंवा बंधू असोत किंवा आप्तेष्ट असोत आजचा दिवस हिंदू समाजात अनन्यसाधारण महत्त्वाचा दिवस समजला जातो आज खऱ्या अर्थाने गुरूची सेवा शिष्याला करायची संधी मिळते. आज या निमित्ताने हजारो शिष्य मिरजेतील प्रभाग तीन मधील पूर्व म्हाडा कॉलनी येथे असणाऱ्या श्री स्वामी समर्थ मंदिरात स्वामी चरणी सकाळ पासून लीन झाले. आज गुरुपौर्णिमा निमित्ताने मिरजेतील जेष्ठ कीर्तनकार सौ वैशालीताई जोगळेकर यांच्या सुश्राव्य कीर्तना ने येथील रसिक श्रोते अगदी चिंब भिजले. आज पहाटे पासून श्रींच्या अभिषेक आणि पूजा अर्चेसाठी भाविकांची मोठी गर्दी होती मंदिरामध्ये श्री रवींद्र कबाडे सह कुटुंब येणाऱ्या भाविकांचे मनोभावे स्वागत केले.






Leave a Reply