Advertisement

मिरजेतील शासकीय रुग्णालयात मिळणार आता कॉर्पोरेट दर्जाचे उपचार; मॉड्युलर आय सी यु कार्यान्वित

प्रतिनिधी सुधीर गोखले

मिरजेतील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात अलीकडील काळात खाजगी रुग्णालयाच्या तोडीस तोड उपचार पद्धती सुरु करत असताना जवळजवळ २५ वेगवेगळ्या विभागामार्फत रुग्णांवर अत्याधुनिक पद्धतीचे उपचार होत आहेत. आज मिरज आणि मिरज तालुक्यातील गोर गरीब रुग्ण अत्यंत कमी खर्चामध्ये या रुग्णालयामध्ये अगदी कॉर्पोरेट स्तरावरील उपचार घेत आहेत. आमच्या प्रतिनिधींनी यासंदर्भात अधिक माहिती घेताना या रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ प्रकाश गुरव आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ रुपेश कुमार शिंदे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, आज आम्ही या रुग्णालयामार्फत अत्यंत किचकट आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया पार पाडत असताना आम्हाला खूप आनंद वाटतो कि गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता आमच्या कडे असणारे तज्ज्ञ डॉक्टर्स रुग्णांच्या मदतीला नेहमी धावून जातात. साधारण जून २०२६ पर्यंत जवळ जवळ ८२०० गंभीर रुग्णांवर प्रभावी आणि सुरक्षित उपचार करण्यात आले असून सद्य स्थिती मध्ये या रुग्णालयामध्ये २५ अत्याधुनिक पद्धतीचे बेड मेडिसिन मॉड्युलर आय सी यु विभाग कार्यरत आहेत.या उपचार पद्धतीमुळे आता गोरगरीब रुग्णांना कॉर्पोरेट खाजगी रुग्णालयासारखे उपचार घेणे सोपे जाणार आहे ते हि कमीत कमी खर्चामध्ये. मॉड्युलर आय सी यु मुळे संसर्गाचा धोका हा शून्य टक्के असतो. या आय सी यु मध्ये अँटी बॅक्टरीयल (जिवाणू विरोधक) भिंती आणि फ्लोरिंग चा वापर केला आहे. विशेष करून हवेतील संसर्ग आणि जंतू रोखण्यासाठी HEPA फिल्टर्स आणि अत्याधुनिक व्हेंटिलेशन सिस्टीम बसवण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या सुविधेमुळे रुग्णांना होणार रुग्णालयातील अंतर्गत संसर्गाचा धोका राहिला नाही.प्रत्येक बेड सोबत अत्याधुनिक जीवरक्षक प्रणाली मल्टी पॅरा मॉनिटर्स प्रगत व्हेंटिलेटर इन्फयुजन पंप आणि सेंट्रलाइज ऑक्सिजन ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. डॉ रुपेश शिंदे म्हणाले सर्वात महत्वाचे म्हणजे आता रुग्णालयात चोवीस तास विद्युत पुरवठा आणि वैद्यकीय ऑक्सिजन ची सोय करण्यात आली आहे. मॉड्युलर रचनेमध्ये प्रत्येक बेड मध्ये ठराविक अंतर आणि पडद्याची व्यवस्था आहे. यामुळे रुग्णाची गोपनीयता ठेवली जाते. साधारणपणे आपण जर खाजगी रुग्णालयामध्ये गेला तर आयसीयू चा एक दिवसाचा खर्च हा हजाराच्या वरती असतो मात्र मिरजेच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये पिवळ्या रेशनकार्ड धारकांना मोफत इलाजाची सोया आहे तर शासनाच्या सर्व सुविधा उपलध आहेत.सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यातून तसेच कर्नाटकातील हजारो रुग्ण दैनंदिन या रुग्णालयामध्ये उपचार सध्या घेत आहेत. राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मंत्री ना हसन मुश्रीफ यांनी ५० बेड चे मोड्यूलाबर आय सी यु हे राज्यशासन योजनेतून मंजूर केले आणि उभे करून दिले या साठी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पाठपुरावा केला. असेही यावेळी डॉ रुपेश शिंदे यांनी आवर्जून नमूद केले. भविष्यामध्ये अजून खूप आवश्यक अशा सुविधा या रुग्णालयामध्ये उभ्या करण्याचे आमचे प्रयत्न आहेत त्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी प्रस्ताव देखील शासनाकडे सादर केला आहे. सध्या रुग्णालय आवारातील मजबूत असे रस्ते करणे सुरक्षेसाठी प्रवेशद्वार उभारणे आदी कामे प्रस्तावित आहेत. आणि प्रगतीपथावर आहेत.                          .

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!