Advertisement

मिरजेमध्ये १६४ वाहनधारकांवर कारवाई; लाखांवर दंड वसुली; वाहतुकीला शिस्त लावणार; वाहतूक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे

प्रतिनिधी सुधीर गोखले

अरुंद रस्ते त्यात बेशिस्त पार्किंग हि मिरज शहरासाठी काही नवीन बाब नाही. मात्र आता वाहतूक पोलिसांनी नागरिकांना आणि बेदकार पणे वाहने चालवणाऱ्या वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी दंडात्मक कारवाईचा बडगा उचलण्याचे ठरवले असून त्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे मिरजेमध्ये शहरा मध्ये वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्ब्ल १६४ वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मिरज शहर वाहतूक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे यांनी आमच्या प्रतिनिधीशीं बोलताना दिली. ते म्हणाले मिरजेमध्ये काही रस्त्यावर सुरळीत आणि सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने मी अभ्यास करत आहे. महापालिका आणि आमचा विभाग यांच्या समन्वयातून भविष्यात वाहतूक कोंडी अथवा पार्किंग च्या समस्येतून मिरजकरांची नक्की सुटका होईल. आम्ही सध्या वाहनधारकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहोत आमच्या कर्मचाऱ्यांनी वाहतुकीची शिस्त मोडणाऱ्या १६४ वाहनांवर कारवाई केली असून यामध्ये १ लाख ५५ हजार ७५० रु इतका दंड वसूल केला असून यापुढेही हि कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. वाहतुकीच्या बाबत मी विविध रिक्षा टेम्पो आणि इतर वाहनांच्या संघटनांशी चर्चा करत आहे. नागरिकांच्या संवादातून मिरजेतील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आम्ही काही ठिकाणी नाकाबंदी चे प्रयोजन करून जवळजवळ २०० च्या वर गाड्यांची तपासणी केली आहे. यापुढे शहरामध्ये काळ्या फिल्म लावलेल्या काचा चालणार नाहीत तर फॅन्सी निबर प्लेट ट्रिपल सीट वाहनधारक आढळ्यास आमचे कर्मचारी तात्काळ दंडात्मक कारवाई करणार आहेत आणि सध्या हा कारवाई सुरु आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!