Advertisement

‘परमशेट्टी मल्टीस्पेशालिटी’ मध्ये आता कॅशलेस सुविधा, विमा कंपन्यांशी संलग्नता; डॉ विनोद परमशेटटी यांची माहिती

प्रतिनिधी सुधीर गोखले

आरोग्यपंढरी मिरजेतील प्रसिद्ध जेष्ठ धन्वंतरी डॉ विनोद परमशेट्टी यांच्या परामशेट्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ने एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे गोरगरीब रुग्णसेवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या रुग्णालयामध्ये आता कॅशलेस सुविधांचा आरंभ होत आहे. जी आय सी अंतर्गत या रुग्णालयामध्ये आता सर्व प्रमुख विमा कंपन्यांची संलग्नता असणार आहे. या मुळे जे रुग्ण विमा धारक आहेत त्यांना कॅशलेस सुविधा मिळणार असल्याची माहिती या रुग्णालयाचे संचालक डॉ विनोद परमशेट्टी, डॉ श्रुती परमशेट्टी यांनी दिली ते म्हणाले,’रुग्णांना अधिक दर्जेदार आणि परवडणारी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. रुग्णांना उपचार घेण्यासाठी आर्थिक अडचणी येऊ नयेत उपचार वेळेवर व्हावेत हा यामागील उद्देश आहे. यासाठी आमचे रुग्णालय प्रशासन वेळोवेळी विविध शासकीय योजना आणि विमा कंपन्यांशी संलग्न होत असते. सध्या आमच्या रुग्णालयामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य्यता निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेप्रमाणे पात्र रुग्णांना शासन नियमानुसार आर्थिक साहाय्य मिळत असते. त्यामुळे अत्यंत गंभीर आजारावरचे उपचार सुलभ होतात. सध्या रुग्णालयामध्ये २४ तास अत्यावश्यक सेवा, आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण आयसीयू, ऑपरेशन थियेटर, कॅशलेस उपचार सुविधा उपलब्ध आहेत लवकरच राज्य कामगार विमा योजना सुरु करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे तोही लवकरच मंजूर होईल असेही त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी संचालक डॉ मोहमद गौस शेख, प्रमोद घाडगे, एच आर उमेश बनसोडे, व्यवस्थापक श्रीकांत कोळी, सहायक व्यवस्थापक अमोल कांबळे आदी उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!