प्रतिनिधी सुधीर गोखले
पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी नशामुक्त सांगली जिल्हा करण्याची घोषणा केली होती त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या आदेशाने तसेच मिरजेचे विभागीय पोलीस अधिकारी (अतिरिक्त कारभार) मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी पोलीस चौकी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार खालिद रियाज मोमीन हा गांजाच्या पुड्या विक्रीसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या मागील बाजूस अंधार असणाऱ्या बोळात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्याप्रमाणे पथकाने सापळा रचला असता मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने संशयित सराईत गुन्हेगार खालिद रियाज मोमीन (वय ३४ रा अमर टॉकीज जवळ मिरज) हा एका दुचाकीवरून आला असल्याचे दिसून आले त्याच्या कडे प्लास्टिक पिशवी होती पोलीस पथकाला संशय आल्याने त्याला शिताफीने पकडले त्याची अधिक तपासणी केली असता त्याच्याकडे तयार गांजाच्या एकूण १०३ प्लॅस्टिकच्या पुड्या आढळून आल्या याचे वजन जवळजवळ ५७६ ग्रॅम आहे. आणि एक मोटारसायकल असा एकूण ४३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी नशामुक्त सांगली जिल्ह्यासाठी त्यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दी मध्ये नाशामुक्ती साठी प्रयत्न केले आहेत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांच्यासह पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे सन्मान पत्र आणि बक्षिसे देऊन कौतुकही केले आहे.
Leave a Reply