कोयना धरणामध्ये गुरुवार पर्यंत अर्धशतकी पाणी साठ्याचा टप्पा गाठला आणि संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांनी निःश्वास सोडला. जून महिन्यामध्ये ओढ दिलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच जोरदार बॅटिंग करत अवघ्या ९ दिवसात ३६ टी एम सी पाण्याची आवक धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झाली असून. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती दिली आहे अधून मधून हलक्या सरी हजेरी लावत आहेत. मंगळवारी पाणलोट क्षेत्रामध्ये सर्वाधिक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पाण्याची आवक ९३ हजार क्युसेक्स पर्यंत पोचली. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आतापर्यंत कोयना येथे १६३२, नवजा येथे १९११ तर महाबळेश्वर येथे सर्वाधिक २३२७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या दहा वर्षाचा धरणाचा इतिहास पाहिला तर २८ जून २०१५, १८ जुलै २०१६, १८ जुलै २०१७, ११जुलै २०१८, २१ जुलै २०१९ २४ जुलै २०२० १८ जुलै २०२१ आणि १६ जुलै २०२२ मध्ये धरणाच्या पाणीपातळी ने पन्नाशी गाठली आहे.Website: http://satyarath.com/wp-admin
Leave a Reply