Advertisement

सांगली अर्बन बँकेतर्फे चिंतामणराव व्यापार महाविद्यालय येथे वृक्षारोपण

प्रतिनिधी सुधीर गोखले
नेहमी सामाजिक कार्यात अग्रस्थानी असणाऱ्या सांगली अर्बन को ऑप बँकेने आज निसरगाशी संवाद साधत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले  सांगलीतील चिंतामणराव व्यापार महाविद्यालय येथे झालेल्या या  उपक्रमांतर्गत महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये आवळा, चिंच, आंबा, कडुलिंब, जांभूळ, फणस या झाडांचा समावेश होता.नेहमी सामाजिक कार्यात अग्रस्थानी असणाऱ्या सांगली अर्बन को ऑप बँकेने आज निसरगाशी संवाद साधत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले  सांगलीतील चिंतामणराव व्यापार महाविद्यालय येथे झालेल्या या  उपक्रमांतर्गत महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये आवळा, चिंच, आंबा, कडुलिंब, जांभूळ, फणस या झाडांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष सी.ए श्रीपाद खिरे, व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष गणेश गाडगीळ होते. यावेळी अध्यक्ष श्रीपाद खिरे म्हणाले “निसर्गाचे संवर्धन ही आजची गरज आहे. या वृक्षारोपणातून आम्ही विद्यार्थ्यां मध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आज लावलेले प्रत्येक झाड उद्याच्या पिढीला सावली आणि शुद्ध हवा देईल.
चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश कुंभार यांनी बँकेच्या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले “सांगली अर्बन बँक सामाजिक उपक्रमांसाठी नेहमीच सहकार्य करत आली आहे. हा उपक्रम परिसराला नक्कीच हिरवागार करेल. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक यांनीही पर्यावरण संवर्धनाचे महत्व स्पष्ट केले. 
यावेळी बँकेचे संचालक सी.ए अनंत मानवी,एच. वाय. पाटील, संजय धामणगावकर, संचालिका सौ. स्वाती करंदीकर, सरव्यवस्थापक वासुदेव दिवेकर, उपसरव्यवस्थापक आनंद एकबोटे तसेच वरिष्ठ अधिकारी व महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. संदीप कुलकर्णी यांनी आभार मानले. या उपक्रमाचे नियोजनात महाविद्यालयाचे प्रा.आशिष पुराणिक, प्रा.सिंहासने, भास्कर पाटील, सचिन माळी,प्रसाद कुलकर्णी यांचे सहकार्य मिळाले

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!