प्रतिनिधी सुधीर गोखले
तत्कालीन आयुक्त नितीन कापडणीस यांच्या प्रयत्नातून सांगलीतील विद्यानगर-वारणाली येथील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल’चा प्रस्ताव मंजूर झाला निधीही आला मात्र सध्या या रुग्णालयाच्या खाजगीकरणाचा घाट नेतेमंडळी आणि प्रशासनाकडून घातला जात आहे. सर्वसामान्यांना हक्काच्या आणि परवडणाऱ्या आरोग्य सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. पण प्रशासनाच्या या निर्णयामुळे सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडले जात आहे. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, सांगलीचे लोकप्रतिनिधी नक्की कोणासाठी काम करत आहेत? सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील या खाजगीकरणावर गप्प का आहेत? सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी या गंभीर विषयावर मौन का बाळगले आहे? जनतेने ज्यांना आपल्या हक्कासाठी, आपल्या प्रश्नांसाठी आवाज उठवायला निवडून दिले, तेच मुख्य नेते आज जनतेच्या आरोग्याचा खेळखंडोबा होत असताना ‘धृतराष्ट्र’ बनून का बसले आहेत? सत्ताधारी आणि विरोधक या विषयावर एकत्र येऊन गप्प का आहेत, यातच सर्व काही समजून येते! याविषयी लोकहित मंच चे अध्यक्ष मनोज भिसे म्हणाले आमची स्पष्ट मागणी आहे: “विद्यानगर-वारणाली हॉस्पिटलचे खाजगीकरण तात्काळ थांबले पाहिजे. हे हॉस्पिटल सर्वसामान्य सांगलीकरांच्या सेवेसाठीच सरकारी/महापालिका नियंत्रणात राहिले पाहिजे!”
जागे व्हा लोकप्रतिनिधींनो, जनतेला उत्तर द्या! आणि सध्या हा विषय महासभेपुढे ठेवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र या सर्वांमध्ये फरफट होतीये ती सर्वसामान्य नागरिकांची जे वेळोवेळी महापालिकेला घरपट्टी भरणा करतात पाण्याची बिले वेळोवेळी अदा करतात मात्र त्यांच्या साध्य मूलभूत गरजा महापालिकेकडून पूर्ण होऊ शकत नाहीत हे सर्वांचेच दुर्दैव म्हणावे लागेल.
Leave a Reply