मिरजेच्या रोटरी क्लब च्या नवीन कार्यकारिणीची निवड नुकतीच संपन्न झाली यामध्ये चार्टड अकाउंटंट सिद्धार्थ मजती यांची अध्यक्षपदी तर आशुतोष स्वामी यांचीसचिव पदी निवड करण्यात आली. तर सर्वोत्कृष्ट रोटेरियन चा ‘किताब प्रा डॉ रवींद्र फडके आणि कंपनी सेक्रेटरी अभय गुळवणी यांनी पटकावला. तर उत्कृष्ट फेलोशिप चा ‘किताब उद्योजक चैतन्य कौलगुड व वैभव कौलगुड यांना देण्यात आला. इन्स्टॉलेशन अधिकारी म्हणून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ सुहास जोशी आणि सलील लिमये उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ मिरज चे इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे आहेत.,माजी अध्यक्ष ॲड. स्वानंद कौलगुड, पुढील अध्यक्ष डॉ. रियाज मुजावर, उपाध्यक्ष ज्ञानराज सावंत ,जनसंपर्क अधिकारी ॲड. सचिन हडीफोड, क्लब सेवा संचालक विजयकुमार कांबळे, समाजसेवा संचालक आर्किटेक्ट समीर गोखले , आंतरराष्ट्रीय सेवा संचालक चेतन चव्हाण, व्यावसायिक सेवा संचालक रवींद्र फडके आणि राजेंद्र नागरगोजे ,युवा सेवा संचालक सचिन चौगुले, रोटरी फाउंडेशन समिती अध्यक्ष अमित जोशी, सेवा प्रकल्प समिती अध्यक्ष कल्पेश शहा ,प्रशासन समिती अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध कुलकर्णी ,सदस्यत्व समिती अध्यक्ष गिरीश लांडगे, ऑन-टू-कॉन्फरन्स समिती अध्यक्ष डॉ. मिलिंद कुलकर्णी, संपादक शुभंकर कोल्हार, सभागृह शिस्तपाल अभिजित शिंदे आणि ऋषिकेश दाणेकर ,आरोग्य सेवा संचालक डॉ. सुनील कुलकर्णी, डॉ. राहुल गोसावी, डॉ. अमेय कुलकर्णी आणि गणेश कोळसे, सल्लागार चंद्रशेखर मराठे आणि ॲड. बाळासो जाधव
Leave a Reply