वैजापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी रियाज शेख यांची निवड
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर

वैजापूर नगर परिषद निकाल लागल्यानंतर मागील काही दिवसानंतर वैजापूर उपनगराध्यक्षपदी कोण होणार याची चर्चा सुरू असल्याकारणाने आज 16 जानेवारी रोजी वैजापूर नगर परिषदेच्या सभा गृहात नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या निवडीसाठी उपनगराध्यक्षपद साठी एकूण दोन अर्ज दाखल करण्यात आले होते मात्र भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी असल्याने विशाल संचेती यांचा अर्ज अवैध ठरला त्यामुळे रियाज शेख यांची उपनरअध्यक्ष पदी निवड करण्यात आली तर स्वीकृत नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पार्टी कडून प्रशांत कंगले व प्रकाश चव्हाण ,विजय दायमा,वाजिद कुरेशी ,तर शहर विकास आघाडी कडून तर इमरान कुरेशी व शिवसेना शिंदे गटाकडून संजय बोरणारे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र सर्वांना प्रकाश चव्हाण व प्रशांत कंगले शिवसेनेचे शिंदे गट संजय बोरणारे यांच्या नावाची शिफारस केल्याने त्यांना स्वीकृत नगरसेवक पदी निवड करण्यात आली सर्वांनी या निवडीचे स्वागत केले व आनंदोत्सव साजरा झाला

















Leave a Reply