तीन तास चालले जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार प्रशिक्षण,योगासन
सोलापूर प्रतिनिधी संतोष दलभंजन

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आयुष संचालनालय महाराष्ट्र मुंबई जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर,म.न पा सोलापूर, क्रीडा भारती सोलापूर आस्था सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हरिभाई दैवकरण कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर येथे जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार प्रशिक्षण व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर या सूर्यनमस्कार प्रशिक्षण स्पर्धेत एकूण 150 विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते.
सदर या जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धेचे उद्घाटन दिपा पाठक ( प्राचार्या हरिभाई दैवकरण कनिष्ठ महाविद्यालय) देवानंद चित्राल ( छत्रपती योग साधना मंडळ अंबड राज्य समन्वयक)आर.आर गायकवाड ( तालुका क्रीडाधिकारी) , नदीम शेख ( क्रीडाधिकारी) डॉ विलास हरपाळे ( क्रीडा भारती जिल्हाध्यक्ष) सुधीर देव ( क्रीडा भारती शहराध्यक्ष)अरुण उपाध्ये ( क्रीडा भारती उपाध्यक्ष) राजेश कळमणकर ( क्रीडा भारती संचालक) प्रा.प्रमोद चुंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या वतीने
महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांची जयंती व राज्य क्रीडा दिन साजरा करण्यात आला.

छत्रपती योग व क्रीडा प्रशिक्षण अंबड तालुका जिल्हा जालना येथे झालेल्या राज्यस्तरीय शिक्षक प्रशिक्षण स्पर्धा आणि दोन दिवसीय योग साधना शिबिरातून सुरनमस्कारांचे प्रशिक्षण घेऊन आलेल्या मास्टर ट्रेनर सुहास छंचुरे व परमेश्वर व्हसुरे यांच्या तांत्रिक समितीने सूर्यनमस्कार स्पर्धा घेण्यात आले.
सदर या सूर्यनमस्कार स्पर्धेत उमाबाई श्राविका,पी.एस. इंग्लिश, दमाणी प्रशाला, छत्रपती शिवाजी प्रशाला संगमेश्वर कॉलेज, वि.म.मेहता प्रश्नाला, कन्या प्रशाला, हरिभाई दैवकरण कनिष्ठ महाविद्यालय,संभाजीराव शिंदे शाळा,योग साधना मंडळ, राज मेमोरियल हायस्कूल विविध शाळा सहभागी झाले होते.
सदर देवानंद चित्राल ( राज्य समन्वयक) यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रशुद्ध पद्धतीने सूर्यनमस्कार प्रशिक्षण 12 मंत्र्यांसह घेण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास छंचुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रमोद चुंगे यांनी मानले
हे जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार प्रशिक्षण व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा.प्रमोद चुंगे, रोहन घाडगे, सोमनाथ मगर, प्रतिमा स्वामी, शितल शिंदे, यांनी परिश्रम घेतले.
सर नमस्कार स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त खेळाडूंना क्रीडा भारती सोलापूर यांच्या वतीने मेडल्स, ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

अंतिम निकाल पुढीलप्रमाणे
शालेय गट. मुली
प्रथम.पी.एस. इंग्लिश मीडियम
द्वितीय. वि.म.मेहता
तृतीय. उमाबाई श्राविका
शालेय गट मुले.
प्रथम पी.एस. इंग्लिश
द्वितीय वि.म मेहता
तृतीय. शिवाजी प्रशाला
खुला गट मुले
प्रथम. स्नेह साधना मंडळ
द्वितीय.शिवोहम योगा क्लास
तृतीय दमानी प्रशाला
खुल गट मुली
प्रथम स्नेहसाधना मंडळ
द्वितीय दमाणी प्रशाला
तृतीय कन्या प्रशाला
शिक्षक ग्रुप महिला
प्रथम गायत्री हजारे
द्वितीय अर्चिता आघाव
तृतीया स्वामी प्रतिमा
शिक्षक ग्रुप
प्रथम दत्ता ढोणे
द्वितीय ऋषिकेश पट्टा
तृतीय सोमनाथ मगर


















Leave a Reply