Advertisement

श्राविका शिक्षण संकुलात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

श्राविका शिक्षण संकुलात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

सोलापूर प्रतिनिधी संतोष दलभंजन

भारतीय संविधान चिरायू होवो आणि भारत माता की जय अशा घोषणांच्या निनादात आज श्राविका शिक्षण संकुलात भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात आणि देश प्रेमाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री डॉक्टर विशाल गोरे , श्री कांचन आगावणे, करुणा कांचनकोटी व संस्थेचे विश्वस्त देवई शहा, दीप्ती शहा, मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे, मुख्याध्यापिका स्वाती कांबळे,उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित मॅडम, पर्यवेक्षक पौळ तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक वृंद उपस्थित होते.

सर्व मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी राष्ट्रगीत आणि ध्वजगीत गाऊन तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. तसेच इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत व नृत्य सादर केले. नंतर संगीत कवायत प्रकार देशभक्ती गीतावर सादर करण्यात आले. संस्थेतील हिरूबाई ग्रंथालयाच्या वतीने आदर्श वाचक व आदर्श वाचक वर्ग याचे पारितोषिक देण्यात आले. तसेच याप्रसंगी जैन शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणाचे महत्त्व सांगितले.देश हा सर्वोच्च आहे आणि तिरंग्याची शान ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे असे त्यांनी सर्वांना सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा कट्टीमनी व प्रगती गांधी यांनी केले. तर मुख्याध्यापिका राखी देशमाने मॅडम यांनी प्रास्ताविक केले .आभार जयश्री दळवे यांनी मानले.पाहुण्यांचा परिचय तृप्ती शहा यांनी करून दिली.
शेवटी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार अंतर्गत लाडू वाटप करण्यात आले.
अशाप्रकारे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!