लाडगाव परिसरात पुन्हा बिबट्याचे सावट… शेतकऱ्यांनी सावध राहण्याची उपायोजना करावी
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर

वैजापूर तालुक्यात बिबट्याचे अजूनही बऱ्याच प्रमाणात जनावरे शेळी व मनुष्यवरही हल्ला होऊ शकतो वैजापूर तालुका लाडगाव येथील शेतकरी अरुण निवृत्ती निंबाळकर यांच्या वस्तीवर मध्यरात्री बिबट्याने हल्ला करत जनावरे खाण्यात आली त्यांनी सकाळी उठून बघितल्यानंतर तत्काळ वन विभाग वैजापूर येथील अधिकाऱ्यांना फोन केला असता वन परीक्षण अधिकारी आस्मा सय्यद यांना कळविले त्यांनी या घटनेची तत्काळ दक्षता घेत पंचनामा केला व ही बिबट्याचीच खुणे होती असे प्रसिद्ध झाले सर्व शेतकऱ्यांना त्यांनी आवाहन केले आहे की आपले जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावे परिसरात जास्त प्रमाणात ऊस असल्याकारणाने बिबट्या या ठिकाणी कुठे आढळून येऊ शकतो शेतकऱ्यांनी या गोष्टीचे तत्काळ दक्षता घ्यावी असे आवाहन वन परीक्षण अधिकारी आसमा सय्यद यांनी केली आहे

















Leave a Reply