पाचोरा : रोटरी क्लब पाचोरा भडगाव कडून रेल्वे स्टेशनला व्हील चेअर भेट
पाचोरा : रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांचे कडून पाचोरा रेल्वे स्टेशन येथे वयोवृद्ध, आजारी, दिव्यांगा साठी 2 व्हिल चेअर व 2 स्ट्रेचर भेट देण्यात आले. रो प्रा नितीन सोनवणे सर यांच्या सौजन्यातून त्याचे कै आई वडील यांचे स्मरणार्थ देण्यात आले.या कार्यक्रमासाठी रेल्वे चे जनरल मॅनेजर विवेक कुमार गुप्ता, भुसावळ डी आर एम निखिल अग्रवाल तसेच पाचोरा स्टेशन प्रबंधक विजय पाटील यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.तरी या कार्यक्रमासाठी डॉ मुकेश तेली अध्यक्ष रोटरी क्लब पाचोरा भडगाव,डॉ अजयसिंग परदेशी सचिव,रोटरी सदस्य भरत सिनकर, निलेश कोटेचा,डॉ गोरख महाजन,डॉ बाळकृष्ण पाटील,डॉ अमोल जाधव,पिंकी जिनोदिया,संजय कोतकर,डॉ सिद्धांत तेली,डॉ राहुल काटकर,नितीन जमदाडे, नितीन तायडे, उज्वल ठाकरे,पुंडलिक पाटील,ज्ञानेश्वर पाचोळे,लक्ष्मण जाधव,चेतन सरोदे, लिलाधर सरोदे यासोबत अखिल भारतीय प्रांत सचिव डॉ अनिल देशमुख, तालुकाध्यक्ष संजय पाटील,शरद गीते, चिंधु मोकळ,सुधाकर पाटील यासोबत रोटरी क्लब पाचोरा भडगाव चे अनेक सदस्य उपस्थित होते.रोटरीच्या या सेवाभावी कार्याचा रेल्वेचे जनरल मॅनेजर साहेबांकडून कौतुक केले गेले. रेल्वे कडून स्टेशन प्रबंधक विजय पाटील यांनी आभार मानले.

















Leave a Reply