वैजापूर शहरात भर दिवसा घरफोडी
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
वैजापूर शहरातील लाडगाव रस्त्यावरील रचना कॉलनी येथे अज्ञात चोरट्यांनी दुपारी सुमारे साडेबारा ते दीडच्या सुमारास घराचे दरवाजा तोडून कपाटातील रोख रक्कम 30 हजार व तीन तोळे सोने घेऊन अज्ञात चोरटे फरार झाले आहेत.
रचना कॉलनी येथील रहिवासी श्री पवार सर हे आपल्या कुटुंबासह रचना कॉलनी येथे राहतात ते जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून आहेत आज खुलताबाद उरूस असल्याकारणाने सुट्टी होती त्यामुळे ते काही कार्यक्रमानिमित्त येवला या ठिकाणी गेले होते परंतु दुपारी कार्यक्रम आटपून घरी तीन वाजता आले असता त्यांनी दरवाजा उघडून बघितले तर घरामध्ये पूर्ण पसरा पांगलेला होता
घराची अवस्था पूर्ण कपडे कपडे केलेले होते त्यांनी तत्काळ शेजाऱ्यांना बोलावून सांगितले असता घराच्या पाठीमागील साईडने दरवाजा तोडून चोरटे आत घुसून चोरी केले त्यांनी तत्काळ वैजापूर येथील पोलीस स्टेशन येथे कळविले असता पोलीस स्टेशनच्या दोन्ही गाड्या त्या ठिकाणी दखल झाल्या व पंचनामा करून अधिक तपास वैजापूर पोलीस स्टेशन हे करत आहे.