*वैजापूर विधानसभेच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक –
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
श्री राजेन्द्र कराळे वैजापूर विधानसभा अध्यक्ष* येत्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वैजापूर तालुक्यासह महाराष्ट्रभर राजकीय वातावरण आता ढवळून निघत आहे प्रत्येक पक्ष आपापल्या परीने बैठकीचे आयोजन करीत पक्षाच्या कार्यकर्त्यांना बोलावून मते अजमावत आहे. त्याच प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाची भूमिका काय ? असणार !कार्यकर्त्याची भूमिका काय ? असणार प्रत्येकाचे मतं बैठकीत जाणून घेण्यात आले.राषवट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जवळ जवळ सर्वप्रमुख कार्यकर्त्यांनी या बैठकीला उपस्थिती दर्शवून आप आपले मत मतांतरे व्यक्त केले. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूक संदर्भात शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जंग जंग पछाडून आपल्या पक्षाला उमेदवारी मिळाली तर तो उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे सुतोवाच सर्व कार्यकर्ते, नेते यांनी व्यक्त केले.सदर बैठकीचे आयोजन वैजापूर विधानसभा अध्यक्ष तथा माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य श्री राजेंद्र कराळे यांच्या अध्यक्षतेखाली वैजापूर येथील हॉटेल वनश्रीच्या हॉलमध्ये घेण्यात आली.विधानसभा अध्यक्ष यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात प्रत्येक कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी तन-मन-धनाने प्रयत्न केल्यास वैजापूर विधानसभा जिंकण्यास आपणास कोणी रोखू शकणार नाही असे मत व्यक्त केले आज जरी कार्यकर्ते काही बोलत असले तरी आपल्याला भविष्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून टिकीट मिळाले तर आपल्या उमेदवाराला प्रचंड मताने निवडून आणण्यास तालुक्यातील सर्व सामान्य मतदार नक्की मदत करेल कारण तालुक्यातील सर्वसामान्य माणूस हा शरद चंद्र पवार साहेब यांच्या विचाराला बांधील आहे.आणि त्याच अनुषंगाने काम करण्यात येईल.या प्रसंगी सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष श्री प्रकाश बापु ठुबे,सोशल मीडिया जिल्हा कार्याध्यक्ष श्री रावसाहेब पा.सावंत शहराध्यक्ष जुबेर भाई चाऊस,ग्राहक संरक्षण तालुका अध्यक्ष श्री कैलाश आबा कदम,अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष श्री अकबर भाई शेख,सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष श्री रतन पगारे जिल्हा उपाध्यक्ष श्री युवक संतोष सरोवर,युवक सरचिटणीस श्री संदीप गाजरे,श्री प्रल्हाद मतेश्री संदिप राहिंज श्री रसुल शेख श्री रामेश्वर बोडखे,श्री निवृत्ती तुपे,श्री मच्छिंद्र तागड,सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा अध्यक्ष श्री प्रकाश बापु ठुबे यांनी तर आभार प्रदर्शन शहराध्यक्ष श्री जुबेर भाई यांनी केले