गिनीज बुक नोंद योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह 177 श्रीक्षेत्र शाही पांचाळ या ठिकाणी प्रारंभ
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
नाशिक नगर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये कोलाधाम श्रीक्षेत्र सरला बेट या ठिकाणी सद्गुरु संत श्री सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांनी बऱ्याच वर्षा पासून सप्ताहाची परंपरा चालू ठेवत आमटी भाकरीचा प्रसाद भजन कीर्तन अखंड आठ दिवस भजन असतात प्रवचन असतात लाखोंच्या संख्येने या हरिनाम सप्ताह साठी तीनही जिल्ह्यातून अख्या महाराष्ट्रभर लोक या ठिकाणी येत असतात मागील वर्षी वैजापूर या ठिकाणी सप्ताह झाला होता आता श्रीक्षेत्र शाही पंचाळ तालुका सिन्नर या ठिकाणी सप्ताहाची आज प्रारंभ करण्यात आला यावेळी महंत रामगिरीजी महाराज यांच्या वाणीतून अभंगास सुरुवात करून सप्ताह प्रारंभ झाला