आरोहन अकॅडमी इंग्लिश स्कूलमध्ये डिजिटल निवडणुक पद्धतीने विद्यार्थी प्रतिनिधींची निवड
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
वैजापूर येथील आरोहन अकॅडमी इंग्लिश स्कूल शाळेत प्रत्यक्ष मतदान घेत शालेय मंत्रिमंडळ निवडणूक पार पडली.यामध्ये शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांना लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेची माहिती व्हावी सशक्त भारतासाठी जागरूक नागरिक निर्माण व्हावेत याबाबतची जाणीव बाल वयातच विद्यार्थ्यांना होण्यासाठी हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.एक आठवडा अगोदरच आचारसंहिता घोषित करून उमेदवारांना आपआपले नाम निर्देशन दाखल करण्यास सांगितले,उमेदवार निश्चित झाल्यानंतर त्यांना प्रचारासाठी आठ दिवसाचा कालावधी देण्यात आला.इयत्ता ५ वी ते १० च्या एकूण ४२५ विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला.संपूर्ण निवडणूक ही डिजिटल पद्धतीने घेण्यात आली त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने मतदान करण्याचा अनुभव आला.सर्व विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिया कशी असते.लोकशाहीतील निवडणूका कशा पार पडतात आणि त्याचे महत्व का व काय आहे? याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका बहार खान यांनी दिली.सकाळी ९ वाजेपासून ते दुपारी १ वाजेपर्यंत मतदान झाले व दुपारी २.२० मिनिटांनी सर्व विद्यार्थ्यांसमोर मतमोजणी पार पडली.या निवडणुकित इयत्ता ९ वी तील मुलांमधून एकूण ३ विद्यार्थी निवडणुकीत उभे होते यापैकी अनिकेत गायकवाड याला एकूण २३८ मते मिळाली व किरण डोंगरजाळ याला १५८ व पृथ्वीराज मथुरे याला २१ मते मिळाली.यामध्ये विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अनिकेत गायकवाडचा ८० मतांनी विजय झाला.
इयत्ता ९ वी तील मुलींमधून एकूण ४ विद्यार्थीनी निवडणुकीत उभ्या होत्या यापैकी पलक संचेतीला एकूण १९१ मते , श्रेया शिंदे हिला ९०, साईश्री डोंगरे ८५ मते आणि कांचन पेहेरकरला ६० मते मिळाली.यामध्ये विद्यार्थीनी प्रतिनिधी म्हणून पलक संचेती १०१ मतांनी विजयी झाली.रेड हाऊस कॅप्टन पदासाठी एकूण ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते त्या पैकी सार्थक जाधव याला सर्वाधिक ५३ मते मिळाली व त्याची रेड हाऊस कॅप्टन पदी निवड झाली,तर उप कॅप्टन पदी कृतिका खैरेची निवड झाली.ग्रीन हाऊस कॅप्टन पदासाठी एकूण ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते त्यापैकी संचिता मैंद हिला सर्वाधिक ६१ मते मिळाली व तिची ग्रीन हाऊस कॅप्टन पदी निवड झाली, तर उप कॅप्टन पदी ओम डघळे याची निवड झाली.यलो हाऊस कॅप्टन पदासाठी एकूण २ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते त्यापैकी ईश्वरी साठे हिला सर्वाधिक ७९ मते मिळाली व तिची यलो हाऊस कॅप्टन पदी निवड झाली, तर उप कॅप्टन पदी ओम खटाणे याची निवड झाली.ब्ल्यू हाऊस कॅप्टन पदासाठी एकूण ८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते त्यापैकी स्वामींनी कुलकर्णी हिला सर्वाधिक ५७ मते मिळाली व तिची ब्ल्यू हाऊस कॅप्टन पदी निवड झाली, तर उप कॅप्टन पदी आर्यन गोमलाडू याची निवड झाली.
सर्व विजयी झालेल्या सर्व विद्यार्थी प्रतिनिधींना शाळेच्या संचालिका डॉ. विजया डोंगरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व सर्व विजयी विद्यार्थी प्रतिनिधींचे अभिनंदन केले.या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिक्षक अर्जुन जगताप यांनी काम पाहिले.निवडणूक आयुक्त म्हणून शिक्षक जनार्दन खिल्लारे,निवडणूक केंद्राध्यक्ष म्हणून शिक्षक जालिंदर म्हस्के,निवडणूक अधिकारी-१ म्हणून शिक्षक गालेब सय्यद,निवडणूक अधिकारी-२ म्हणून श्रीमती श्वेता श्रीवास्तव व तसेच मत तालिका व मतमोजणी अधिकारी म्हणून श्रीमती कल्पना अनकोळणेकर व श्रीमती श्रद्धा सोनवणे यांनी काम पाहिले.या निवडणुकीच्या नियंत्रणासाठी पोलीसांच्या भुमिकेत देवराज राजपूत व पियुष गोळेसर या विद्यार्थ्यांनी जबाबदारी पार पाडली.शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रियेचे जिवंत प्रात्यक्षिक अनुभवले व खूप आनंद घेतला. ही निवडणूक यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.