आर्थिक परिस्थिती नसूनही
शेतकऱ्याच्या मुलाने घेतली उंच भरारी वकील होणाचे स्वप्न झाले पूर्ण.
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर.
अतिशय गरीब परिस्थिती असलेल्या कुटुंबातील प्रभाकर वेणूनात समावेशी मुक्काम पोस्ट लाडगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण न्यू हायस्कूल लाडगाव येथे झाले उर्वरित शिक्षण हे वैजापूर येथील विनायकराव पाटील कॉलेज या ठिकाणी झाले त्यांना आयटीआय करायचा होता परंतु घरची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्या ठिकाणी नंबर लागला नाही त्यानंतर त्यांनी वाळूज एमआयडीसी या ठिकाणी एका छोट्याशा कंपनीमध्ये जॉब केला परंतु जीवनामध्ये काहीतरी करून दाखवायचे आहे हाच ध्यास त्यांच्या मनात होता त्यानंतर त्यांनी लाडगाव या ठिकाणी मोबाईल शॉपी सुरू करण्यात आली त्यानंतर त्यांनी ऑनलाईन सेतु सेंटर हे उघडण्यात आले त्यानंतर त्यांनी मोबाईल बँकिंग सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध केली आणि त्यानंतर एलएलबी चे शिक्षण ही त्यांनी पूर्ण केले अशा परिस्थितीमध्ये यांनी आर्थिक परिस्थितीची मात करत वकील बनवण्याचे स्वप्न होते ते त्यांनी आज पूर्ण केले कालच ऑनलाइन निकाल लागल्यामुळे दुसऱ्या डिव्हिजनमध्ये त्यांची निवड झाली.


















Leave a Reply