महायुतीचे उमेदवार रमेश नानासाहेब बोरणारे सर 41658 मतांनी विजयी वैजापूरकरांचा जल्लोष.
लाडकी बहीण व महंत चे आशीर्वाद ठरले योगदान.
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
वैजापूर गंगापूर विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आज वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालय या ठिकाणी पार पडला यावेळी महायुतीचे उमेदवार रमेश नानासाहेब बोरणारे सर यांनी 41 हजार 658 मतांनी विजय मिळविला व एकूण मतदान एक लाख 33 हजार 627 मते पदरात पडली तर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर दिनेश परदेशी यांना मतांनी41658 मतांनी पराभव पत्करावा लागला एकूण मतदान 91969 मते डॉक्टर परदेशी यांना मिळाले. एकूण उमेदवारांना मिळालेले मते खालील प्रमाणे
1) एकनाथराव जाधव 8205 अपक्ष
2) किशोर भीमराव जेजुरकर 5495 वंचित बहुजन आघाडी
३) जेके जाधव 1133 प्रहार संघटना
4) संतोष भाऊराव पठारे 981 बहुजन समाज पार्टी
5,) ज्ञानेश्वर एकनाथ घोडके 618 अपक्ष
6) विजय देवराव शिंगारे 378 बहुजन रिपब्लिकन पार्टी
7) प्रकाश रायभान पारखे 368 अपक्ष
8) नोटा 1723.