वैजापूर तालुक्यात ग्रामीण 80 टक्के तर शहरी भागात 70 टक्के मतदान.
माजी आमदार रमेश बोरणारे यांच्या गाडीवर दगडफेक
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
वैजापूर गंगापूर मतदारसंघांमध्ये आज 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र मध्ये विधानसभेचे निवडणूक चालू आहे त्यामुळे ग्रामीण भागात 80 टक्के मतदान झाले तर शहरी भागात 70 टक्के मतदान झाले किरकोळ ठिकाणी धक्काबुक्की तर काही ठिकाणी शांततेत मतदान पार पडले वैजापूर शहरात दर्गा बेस या ठिकाणी माजी आमदार रमेश बोरणारे यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याची घटना या ठिकाणी घडली शहरात मतदान सुरू असताना काही गोंधळ रमेश बोरणारे यांच्या कानावर आला असताना त्या ठिकाणी जमाव पांगलेला होता जमाव मधून त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती.
महायुतीचे विधानसभेचे उमेदवार डॉक्टर दिनेश परदेशी यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावताना.
महाविकास आघाडीचे विधानसभेचे उमेदवार रमेश बोरणारे यांनी आपला आपल्या गावी चिंचडगाव या ठिकाणी जिल्हा परिषद केंद्र प्रशाला या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला.
काही सुज्ञ मतदार असूनही अडीशे ते तीनशे किलोमीटर दूर होऊन आले असताना त्यांचे मतदान यादीत नावच नाही असा प्रकार वैजापूर तालुक्यात खूप ठिकाणी घडला माझं मतदान माझा हक्क बजावण्यासाठी कालपासूनच मुक्कामी आलेले आपल्या गावी आलेले मतदार मात्र निराश जनक होण्याचे बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळाले.