महाराष्ट्र राज्याचे हवामान अभ्यासक माननीय श्री पंजाबराव डख यांची वैजापूर या ठिकाणी भेट
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
शेतकऱ्यांसाठी हवामान कसे राहील याचा अचूक अंदाज करणारे व शेतकऱ्यांसाठी मोलाचा सल्ला देणारे शेतकरी मित्र महाराष्ट्र राज्याचे हवामान अभ्यासक पंजाबराव डख हे श्रीराम बायो सीड्स प्रायव्हेट लिमिटेड 97 92 या वाणाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वैजापूर या ठिकाणी आलेले होते .
शेतकऱ्यांनी मका हे पीक कशाप्रकारे घेतले पाहिजे अवरेज कशाप्रकारे असले पाहिजे असा मोलाचा सल्ला यावेळी देण्यात आला श्री सुधाकर पाटील साळुंके यांच्या शेतातील मक्का या प्लॉटवर मार्गदर्शन करण्यात आले याप्रसंगी पंचक्रोशीतील शेतकरी व सर्व कृषी सेवा केंद्र मोठ्या संख्येने उपस्थित होते बायो सीड्स कंपनीचे श्री गणेश डांगर सर एमडीओ वैजापूर श्री संतोष पाटील जगदाळे मॅनेजर राजीव भैया साळुंके श्रीकांत भाऊ साळुंके
किरतपूर येथील प्रगतशील शेतकरी संदीपराव ज्ञानेश्वर पाटील मोटे व आदी शेतकरी उपस्थित होते.