आचारसंहिता लागायच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या अन्यथा परिणाम भोगण्यास तयार रहा ………मनोज जरांगे पाटील
प्रतिनिधी गणेश निंबाळकर

श्री क्षेत्र नारायण गड तालुका शिरूर जिल्हा बीड या ठिकाणी आज विजया दशमी दसऱ्याच्या निमित्ताने मराठ्यांचे योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज मराठ्यांना संबोधित केले यावेळी सुमारे 900 एकर मैदान फुल जाम होते तसेच वाहनांच्या सुमारे 40 किलोमीटर पर्यंत फुल महामार्ग जाम होते यावेळी 1)5000000+पाणी बॉटल
2) दोनशे क्विंटल बुंदीचा महाप्रसाद होता
3)1000+डॉक्टर्स उपलब्ध होते
4)100+रुग्णवाहिका होत्या
5)10 (icu) पक्ष स्थापन करण्यात आलेले होते. काही ठळक मध्ये पुढील प्रमाणे
दसरा मेळावा – नारायणगड
मनोज जरांगे पाटील यांच्या भाषणातील मुद्दे
– मराठ्यांनी आजवर कधीही जातीवाद केला नाही
– प्रत्येक घटकाला सांभाळण्याचे, सोबत घेण्याचे काम मराठ्यांनी केले
– वेळप्रसंगी मराठ्यांनी तलवारी हातात घेतल्या, स्वतःचे रक्त सांडले आणि सर्वांना न्याय मिळवून दिला
– मराठ्यांचे नेकमे काय चुकले म्हणून डावलले जात आहे
– देव देवतांनी, छत्रपती शिवरायांनी अन्यायाच्या विरोधात उठाव केला, मराठ्यांना देखील उठाव करावा लागणार
– न्याय मिळाला नाही तर उलथापालथ करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही
– मराठ्यांच्या विरोधात षडयंत्र सुरु आहे, मराठा लोकप्रतिनिधींनी पक्ष आणि नेत्यांपेक्षा समाजाला महत्व द्यावे
– मराठे ओबीसीत आले तर ओबीसींवर अन्याय होईल असे काहीजण म्हणत होते. परवा १७ जाती ओबीसीत घातल्या, तेव्हा ओबीसींवर अन्याय झाला नाही का?
– मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे असे महायुतीकडून लिहून आणा म्हणणाऱ्यांनी १७ जाती ओबीसीत घातल्या तेव्हा महायुतीकडून लिहून घेतले घेतले का?
– १४ महिन्यांपासून सलग मराठ्यांचे आंदोलन सुरु असताना, पण मराठ्यांना आरक्षण दिले जात नाही. पण कोणतेही आंदोलन नसताना १७ जाती ओबीसीमध्ये घालून “मराठ्यांनो तुम्हाला काय करायचे ते करा” असा संदेश सरकारने दिला आहे.
– आचारसंहितेपर्यंत विश्वास ठेवतो. तोपर्यंत आरक्षण दिले नाही तर मराठ्यांची राजकीय भूमिका जाहीर करणार
– नारायणगडाची मर्यादा म्हणून स्पष्ट बोलत नाही. पण मराठ्यांच्या मनात जे आहे तोच निर्णय घेणार
– वेळप्रसंगी मरण पत्करेन पण मराठ्यांची मान खाली होऊ देणार नाही
– जाताना सर्वांनी नारायणगडाचे आशीर्वाद व आनंद घेऊन जा आणि तुमचे दुःख माझ्याकडे सोपवून जा
– मनोज जरांगे पाटील

















Leave a Reply