आदिवासी समाजाच्या वतीने वैजापूर तहसील कार्यालय वर आक्रमक निषेध मोर्चा
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (S T) मध्ये समावेश करू नये व विविध मागण्यांच्या संदर्भात आज वैजापूर तहसील कार्यालय येथे निषेध मोर्चा काढण्यात आला होता तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी दिलेल्या पत्राचा जाहीर निषेध देखील करण्यात आला भिल्ल आदिवासी विकास आराखडा नव्याने तयार करून स्वतंत्र बजेट देण्यात यावे तसेच
असवैधानिक निर्णय घेऊन आदिवासींच्या भावना दुखावल्याप्रकरणी मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा असे देखील भावना व्यक्त केली. आदिवासी समाजा बद्दल अवकातीतील वक्तव्य करणाऱ्या पांडुरंग मेरगळ यांच्यावर अट्रासिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी केली .तालुक्यातील आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.