प्रतिनिधी- तुषार मारुती केंगार
रिपोर्टर सोलापूर जिल्हा
माळशिरस विधानसभा निवडणुकी संदर्भात पीपल्स रिपब्लिकन पार्टीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर
राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप भाई कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माळशिरस तालुक्याची महत्त्वपूर्ण बैठक महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांच्याही निवडी जाहीर करण्यात आल्या.
रविवार 1 सप्टेंबर 2024 रोजी शासकीय विश्रामगृह अकलूज येथे सदरच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी येणाऱ्या माळशिरस विधानसभा निवडणुकीसंदर्भात महत्वपूर्ण चर्चा करून पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने माळशिरस विधानसभा लढविण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला यावेळी माळशिरस तालुकाध्यक्ष हेमंत कांबळे यांनी माळशिरस तालुका नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करून महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते सत्कार करून निवडीची पत्र दिली.
नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये माळशिरस तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षपदी जयश्री गायकवाड अकलूज शहर महिला आघाडी अध्यक्षपदी स्वाती धाईंजे माळशिरस तालुका सांस्कृतिक विभाग तालुकाध्यक्षपदी किसन वाईकर माळशिरस तालुका युवक प्रसिद्धीप्रमुखपदी संदीप तोरणे तालुका युवक सहप्रसिद्धी प्रमुखपदी योगेश डावरे निमगाव मगराचे अध्यक्षपदी सुनील तोरणे यांच्या निवडी जाहीर करून महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते सत्कार करून निवडीची पत्रे देण्यात आली.
यावेळी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीची ताकद माळशिरस तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये वाढवून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पदाचा वापर करणार असल्याचे सांगितले.
यावेळी माळशिरस तालुकाध्यक्ष हेमंत कांबळे उपाध्यक्ष पांडुरंग चव्हाण सरचिटणीस दयानंद कांबळे तालुका संपर्कप्रमुख रोहिदास तोरणे तालुका संघटक मिलिंद चव्हाण तालुका सहकार्याध्यक्ष अनिल तोरणे युवक तालुकाध्यक्ष सचिन मोरे तालुका सरचिटणीस तुषार केंगार अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे युवक तालुका कार्याध्यक्ष शिवम गायकवाड अभिषेक शिंदे दिव्या धाईंजे यांचेसह इतर भीमसैनिक यावेळी उपस्थित होते.