पाचोरा : विवाहितेकडून 10 लाखांची मागणी.
फ्लॅट घेण्यासाठी 10 लाख रुपये आणावे या मागणीसाठी पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील विवाहितेचा छळ करणाऱ्या मालेगाव येथील सासरच्या मंडळींनी विरोधात पाचोरा पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली असल्याची माहिती आज दिनांक 20 मे सोमवार रोजी सायंकाळी 6 वाजता हाती आली आहे. दिनांक 16 फेब्रुवारी 2021 पासून ते दिनांक 18 नोव्हेंबर 2023 पावेतो वेळोवेळी नगरदेवळा येथील माहेर तर मालेगाव येथील सासर असलेल्या तेजस्विनीबाई यांना पती विरेद्रसिंग तसेच सासु, सासरे, जेठ व जेठाणी हे लग्नात मानपान दिला नाही तसेच फ्लॅट घेण्यासाठी माहेरुन १० लाख रुपये आणावे या मागणीसाठी चापटाबुक्यांनी मारहाण करत असल्याबाबतची फिर्याद तेजस्विनी बाई यांनी पाचोरा पोलिसात दिल्यावरून सासरच्या संशयित पाचही जणांविरोधात पाचोरा पोलिसात आज दिनांक 20 मे सोमवार रोजी विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली असून या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मनोहर पाटील हे करीत आहेत.