सत्यार्थ न्यूज रिपोर्टर – किरण माळी
जळगाव प्रतिनिधी दि. 6 सप्टेंबर – जलजीवन मिशनमुळे पाणीपुरवठा विभागाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. पाणी पाजणे हे खरोखरच पुण्यकर्म आहे. यामुळे केवळ दुसऱ्यांना मदत होत नाही, तर आपल्यालाही आत्मिक समाधान मिळते.अडीच वर्षात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाद्वारे जनतेसाठी व कर्मचाऱ्यांसाठी अनेक हिताचे निर्णय घेतले असून म. जी .प्रा. च्या सुमारे 450 अनुकंपाधारक कर्मचाऱ्यांना नोकरीत समावेश केले असून राज्यातील 1074 हातपंप/वीजपंप कर्मचाऱ्यांचा 45 वर्षा पासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावून त्यांना सेवेत कायम सामावून घेता आल्याचे आत्मिक समाधान आहे. मंत्री पदाचा बडेजाव न करता पदाची गरीमा राखण्याचा सतत प्रयत्न केला आहे. आयुष्यात बरेच सत्कार स्वीकारले मात्र हा सत्कार नेहमी स्मरणात राहील. राज्यातील कर्मचाऱ्यांचे प्रेम पाहून मी भारावलो असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जळगाव येथिल आदित्य लॉन येथे आज राज्यस्तरीय हात पंप / वीजपंप दुरुस्ती कर्मचारी संघटने मार्फत भव्य नागरी सत्कार व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते.*
मंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, जल जीवन मिशन मुळे ग्रामीण भागातील महिलांच्या आणि मुलांच्या जीवनात मोठा बदल घडवून येत असून या योजनेमुळे महिलांना आणि मुलांसाठी पाण्यासाठी लांब अंतरावर जावून डोक्यावर हंडे वाहण्याची गरज कमी झाली आहे. तुम्ही केलेल्या प्रेमाच्या सत्काराने काम करण्यासाठी उब मिळणार आहे. जेव्हा – जेंव्हा गरज भासेल तेव्हा – तेव्हा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे सांगितले.
*सन्मान पत्र व गणेश मूर्ती देवून पाणी पुरवठा मंत्र्यांचा भव्य सत्कार !*
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी राज्यातील हातपंप/वीजपंप कर्मचारी संघटनेमार्फत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सन्मान पत्र तसेच श्रीगणेशाची चांदीची मूर्ती भेट देवून भव्य सत्कार करण्यात आला. कर्मचारी संघटने मार्फत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासाठी लिहिलेल्या मानपत्राचे यावेळी वाचन प्रा. हर्षल पाटील यांनी केले त्यानंतर ते ना. गुलाबराव पाटील यांना प्रदान करण्यात आले.
*शाहिरी पोवाड्याने उपस्थित झाले मंत्रमुग्ध*
मंत्री गुलाबराव पाटील यांचे आगमन होताच वाजत – गाजत – नाचत , फटाक्यांच्या आतषबाजीत फुलांची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात कर्मचार्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शाहीर संग्राम जोशी व कलावंतानी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर संघर्षमय जीवनावरील शुण्यातूनही आकाश भेदिले … या पहाडी आवाजात सादर केलेल्या पोवाडयाने उपस्थीत मंत्रमुग्ध झाले होते.
प्रास्ताविकात संघटनेचे कार्यध्यक्ष संजय खोकले यांनी वर्षानुवर्ष प्रलंबीत असलेली मागणी व कर्मचा-यांचे वेतन व सेवानिवृत्ती वेतना बाबतच्या हाल अपेष्टा याबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी गांभीर्याने दखल घेवून कर्मचाऱ्यांना कायम अनुदान देण्याबाबत ऐतिहासिक निर्णयामुळे दिलेले वचनपूर्ती केल्याने आम्ही राज्यातील हातंपप दुरुस्ती कर्मंचारी संघटना ना. गुलाबराव पाटील यांचे ऋण व्यक्त करीत असल्याचे सांगून कार्यक्रमाचे महत्व विषद केले. हे सांगताना उपस्थितांच्या चेहऱ्यावर कृतज्ञता तर होतीच पण खूप मोठा आनंदही होता. बहारदार सूत्रसंचालन प्रा. हर्षल पाटील यांनी केले. तर महासचिव खंडेराव कड यांनी आभार मानले.
यावेळी पुणे भूजलचे सह संचालक हनुमंत राव ढोबळे, संघटनेचे अध्यक्ष दिगंबर मणियार, पदाधिकारी सुभाष सूर्यवंशी, मनोहर कार्लेकर, रवींद्र सेवेकर, यांनी मनोगतात सांगितले की. ना. गुलाबराव पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितही कर्मचाऱ्यांच्या हिताचे घेतलेल्या निर्णयाचे महत्व विषद करून ऋण व्यक्त केले.
*यांची होती उपस्थिती*
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, भूजलचे सहसंचालक हनुमंतराव ढोबळे,संघटनेचे अध्यक्ष दिगंबर मणियार, कार्यध्यक्ष संजय खोकले , महासचिव खंडेराव कड, संघटक रविंद्र सेवेकर, सुभाष सूर्यवंशी , सेवा निवृत्त अभियंता डी.डी. इंगोले, ए.पी. झाल्टे , एस.बी.जाधव , नाना गुटले, आर.सी.मोरे , मनोहर कार्लेकर, भालचंद्र जावतकर, उदय सोळंखे, किरण गरुड, सुनील वाघमारे, लक्ष्मण अनल, संदीप म्हाळगे, अशोक चोपडे , श्री चिद्रवार , तालुका प्रमुख शिवराज पाटील, महानगर प्रमुख गणेश सोनवणे, कुंदन काळे, दिलीप पोकळे, आशुतोष पाटील यांच्यासह राज्यातील विविध भागातून आलेले अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*यांनी घेतले परिश्रम*
कार्यक्रम यशस्वीतेसाठी उप अभियंता सुभाष सूर्यवंशी , वाय. जी.पाटील, सत्तार शेख , अतुल कापडे, कार्याध्यक्ष संजय खोकले, विष्णू बडगुजर , सतीश महाजन , आर. एस. झटकर, आर.पी. देशमुख व हात पंप / वीजपंप दुरुस्ती कर्मचारी संघटनेचे कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.