अभिमान स्पद गोष्ट चक्क वैजापूरच्या धोंदलगावचा विद्यार्थि ने मिळवली पाच सरकारी नोकरीची ऑर्डर.
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
एक सर्वसाधारण कुटुंबातील विद्यार्थी अविनाश जालिंदर आवारे मुक्काम पोस्ट धंदलगाव तालुका वैजापूर असे या विद्यार्थ्याचे नाव आहे .आजच्या परिस्थितीत सर्वांगीण बुद्धिमत्ता ही काही ठराविक मक्तेदारी राहिली नाही… मनात तीव्र इच्छा असेल, कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर…असाध्य ते साध्य…. या संत उक्तीप्रमाणे होत असते.
याचेच ज्वलंत उदाहरण न्यू हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालय धोंदलगावातील विद्यालय विद्यार्थी एक सामान्यातील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला
या पठ्ठ्याने इतकी प्रचंड मेहनत घेतली की, एकाच वर्षात पाच सरकारी नोकऱ्या पटकावल्या. पहिल्याच प्रयत्नात तलाठी परीक्षा पास झाला.निवड प्रक्रिया सुरू होईपर्यंत पोस्टाची परीक्षा चांगल्या मार्काने पास झाला.पोष्टाची नोकरी हातात आल्याबरोबर… राज्य सरकारची प्रतिष्ठेची अशी… एस टी आय ची परीक्षा पहिल्या १० क्रमांकात उत्तीर्ण झाला…. आणि नुकत्याच पी एस आय च्या परीक्षेत राज्यातून खुल्या प्रवर्गातून तिसरा क्रमांक पटकावला.
खऱ्या अर्थानं न्यू हायस्कूल शाळेचा भूषण असलेला अविनाश जालिंदर आवारे याला भावी आयुष्यात खुप खुप यश मिळो आणि त्याने त्याचे स्वतःचे… कुटुंबाचे आणि शाळेचे , गावाचे नाव उज्ज्वल करावे हीच मनापासून सदिच्छा…. !! संपूर्ण तालुक्यात अभिमानाची चर्चा या विद्यार्थ्यांची होत आहे.