ब्रेकिंग भडगांव : धावत्या रेल्वेतून पडल्याने युवकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू
कजगाव ते नगरदेवळा रेल्वे स्टेशन दरम्यान कोणत्यातरी धावत्या रेल्वेतून पडल्याने युवकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भडगाव तालुक्यातील कजगाव ते नगरदेवळा रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे किलोमीटर खंबा क्रमांक 348 जवळ कोणत्यातरी धावत्या रेल्वेतून पडल्याने युवकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 31 मे शुक्रवार रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी घटनेस्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेहास भडगाव ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आलेला असून मयत युवकाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. सदर युवकाच्या खिशात भुसावळ ते जालम असे तिकीट आढळून आल्याने मयत भुसावळ विभागातील, भुसावळ तालुक्यातील, किंवा जळगांव जिल्ह्यातील असावा असा प्राथमिक अंदाज असून त्याची ओळख पटावी म्हणून मयताबाबत कुणास काही एक माहिती असल्यास तात्काळ भडगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार छबुलाल नागरे 9823216970 हे करीत आहेत.