सत्यार्थ न्यूज रिपोर्टर :-किरण माळी
जळगांव,महाराष्ट्र
गिरणा धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुटले
नागरिकांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार
पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या निर्देशानुसार
मा.जिल्हाधिकारी साहेब, जळगाव व मा.कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी दिलेल्या आदेशानुसार काल दि. 24/05/2024 रोजी सकाळी 6.00 वाजता गिरणा धरणातून पिण्याच्या पाण्याचे बिगर सिंचन पाणीवापराचे चौथे आवर्तन 2000 Cusecs (56.63 Cumecs) इतका विसर्ग गिरणा नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे.
पिण्याच्या पाण्याचे चौथे आवर्तन हे भडगाव, पाचोरा, दहिगाव बंधारा, कानळदा पर्यंत आहे. हे पाणी फक्त पिण्यासाठीचे असल्याने सर्व शेतकऱ्यांनी शेतीचे पंप बंद ठेवावे. तसेच नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. यामुळे कानळदा व इतर परिसरातील नागरिकांना पिण्याचा पाण्यासाठी मोठा दिलासा मिळाला असल्याने नागरिकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.