वैजापूर श्रीरामपूर रस्ता बनलाय चिखलमय मनमानी कारभार फलक देखील नाही कुठेही रस्ता खोदला नुसते गड्डेच गड्डे
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर

वैजापूर श्रीरामपूर राज्य महामार्गाचे काम सध्या जोरात चालू आहे वैजापूर व श्रीरामपूर मराठवाडा ते पश्चिम महाराष्ट्र जोडला जाणारा महामार्ग आहे नुकताच सरकारने 106 कोटी रुपये खर्च करून सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता मंजुरी केलेला आहे रस्त्याचे कामही चालू आहे परंतु ठिकठिकाणी दोन किलोमीटर झाले की रस्ता खोदायचा दोन किलोमीटर झाला की रस्ता खोदायचा रस्ता खोदल्यानंतर ताबडतोब मुरूम टाकून स्पीचींग केले तर काहीही वाटत नाही परंतु असे न करता कॉन्ट्रॅक्टर फक्त खोदकाम करत आहे आणि खाली असलेली काळी माती ही रोडच्या कडेला टाकतात त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांची गैरसोय होती व गाड्या सटकतात व पडतात रोज पाच दहा गाड्या पडतातच.
एक छोटासा बाळ व तिची आई माझ्यासमोर गाडीवरून पडली दोघांनाही खूप लागलेलं होतं खर सटलेलं होतं हे पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं मी दोघांनाही उचलून हळू जाण्यास सांगितले व त्यानंतर मी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला फोन केला की बाबा जेवढे काम झालेले असेल तेव्हा ते मुरूम टाका किंवा फक्त दहा दिवस पाऊस शिल्लक आहे दहा दिवस पुढील कामे बंद करा व जे खोदकाम केलेला आहे ते काम क्लिअर करून घ्या पण संबंधित कॉन्ट्रॅक्टर अरे ची भाषा करतो व काय करायचं ते करून घ्या अशा पद्धतीचं बोलणं हे संबंधित कॉन्ट्रॅक्टर मी माझ्याशी केलं. संबंधित कॉन्ट्रॅक्टर हे स्थानिक लेव्हलचे असल्यामुळे कोणाचा ऐकत नाही व त्यांच्या मनाला वाटेल तसंच करतात सध्या नवरात्रीचा उत्सव आहे येणाऱ्या जाण्याची संख्या वाढलेली आहे तरी देखील हे लोकांचा छळ का करतात हेच समजत नाही
शेषराव सोमवंशी ग्रामस्थ लाडगाव



















Leave a Reply