रस्त्यावरील वाढत्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढले आहे त्याचबरोबर काही हौशी वाहनचालकांकडून नियम बाह्य आणि वाहतुकीला अडथळा येईल अशा प्रकारे वाहने चालवली जातात आता यासर्वांवर आरटीओ कार्यलयाची नजर असणार आहे लवकरच जिल्ह्यामध्ये आरटीओ विभागाचे रडार हे अप्लिकेशन कार्यन्वित होईल अशी माहिती सांगली चे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. ते म्हणाले हि प्रणाली वाहनांची नंबर प्लेट स्कॅन करते आणि कॅमरामधून घेतलेली माहिती थेट सर्व्हर ला पायामुळे वाहनचालकांची ओळख पटते आणि दंडाची प्रक्रिया सुरु होते. ते पुढे म्हणाले या प्रणालीमुळे आता बेदकार वाहन चालकांना चांगलाच चाप बसणार आहे आमच्या अधिकाऱ्यांना या प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात येईल त्यानंतर जिल्ह्यामध्ये हि यंत्रणा आम्ही कार्यन्वित करणार आहोत. या प्रणालीची खासियत अशी आहे कि दर तासाला ७०० ते ८०० वाहनांवर इ चलन करण्याची क्षमता यामध्ये आहे. सध्या जिल्ह्यामध्ये फक्त एकाच वाहनावर हि यंत्रणा बसवली आहे टप्प्या टप्प्याने या प्रणालीचा विस्तार आम्ही करणार आहोतWebsite: http://satyarath.com/wp-admin
Leave a Reply