पिंपळगाव (हरे) : रोटरी क्लब पाचोरा तर्फे ताणतणाव व वेळेचे व्यवस्थापन यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

आज दि.23/08/2025 रोजी ग्राम विकास विद्यालय पिंपळगाव हरे येथे रोटरी क्लब पाचोरा भडगाव कडून मानसिक आरोग्य अभियान अंतर्गत ” *ताणतणाव व वेळेचे व्यवस्थापन* ” या विषयावर डॉ प्रशांत सांगडे यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन आयोजित केले होते. त्यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की शालेय जीवनात तणाव कसा येऊ शकतो व तो दूर करण्यासाठी शालेय अभ्यासाबरोबरच योगा प्राणायाम, ध्यान, खेळ,आपले छंद जोपसणे, नेहमी सकारात्मक वृत्ती असे अनेक उपाय सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांना रोटरीच्या समाजकार्यावर अध्यक्ष डॉ मुकेश तेली यांनी संबोधन केले. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब पाचोरा भडगावचे अध्यक्ष डॉ मुकेश तेली, सदस्य चंद्रकांत लोढाया, संजय कोतकर, डॉ प्रशांत सांगडे, डॉ कुणाल पाटील, डॉ सिद्धांत तेली, चिंतामण पाटील तसेच प्रभारी मुख्याध्यापक चौधरी सर, शाळेतील शिक्षक शिक्षिका यासमवेत 400 विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार मांडेवाल सर यांनी केले.

















Leave a Reply