Advertisement

आज मिरजेमध्ये रंगणार दही हंडीचा थरार; जनसुराज्य आणि महायुतीच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दही हंडीचे आयोजन

रिपोर्टर सुधीर गोखले सांगली

आज मिरजेमध्ये दही हंडीचा थरार मिरजकर नागरिकांना अनुभवता येणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दही हंडी हि असेल असा दावा आयोजकांतर्फे करण्यात आला असून जनसुराज्य शक्ती पक्ष आणि महायुती यांच्या संयुक्त विद्यमाने या दही हंडी चे आयोजन केले गेले असल्याचे जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी सांगितले. ते म्हणाले आमच्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉ विनयजी कोरे (सावकर) तसेच आमदार अशोकराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली आजची दही हंडी होत आहे या दही हंडी साठी बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री निकिता दत्ता आणि सई मांजरेकर यांची प्रमुख उपस्थिती असेल या दही हंडी साठी राज्याच्या विविध भागातून संघानी सहभाग नोंदवला आहे. तर भारत सरकारने नुकतेच पाकिस्तान विरुद्ध ऑपेरेशन सिंदूर राबवले होते आम्ही आजची दही हंडी आपल्या भारतीय जवानांना समर्पित करत आहोत आजच्या दही हंडी चे बक्षीस १ लक्ष ५५ हजार ९९९ असणार आहे आजच्या दही हंडी साठी महादेव कुरणे, योगेश दरवंदर डॉ पंकज म्हेत्रे शिव भोसले यांच्यासह जनसुराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते मेहनत घेत आहेत       

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!