पाचोरा : रोटरी क्लब पाचोरा भडगाव आणि पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन कडून अवयवदान जनजागृतीपर पथनाट्य

पाचोरा : रोटरी क्लब पाचोरा भडगाव आणि पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन यांचेकडून जागतिक अवयवदान दिनानिमित्त 13 ऑगस्ट रोजी राजे संभाजी महाराज चौक पाचोरा येथे पथनाट्य सादर केले. कै पी के शिंदे माध्यमिक विद्यालय पाचोरा यांच्या इंटरेक्ट क्लब आणि रोटरी च्या सौजण्याने समाजात जिवंत अथवा मरणोत्तर अवयवदान करने हि काळाची गरज असल्यामुळे हे पथनाट्य सादर केले गेले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून रोटरी क्लब पाचोरा भडगाव अध्यक्ष डॉ मुकेश तेली, सचिव डॉ अजयसिंग परदेशी, पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन अध्यक्ष डॉ पवनसिंग पाटील, सचिव डॉ मुकेश राठोर, अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष व प्रांत सचिव डॉ अनिल देशमुख,महसूल प्रशासन प्रतिनिधी नायब तहसीलदार निकम साहेब, रोटरी पदाधिकारी व सदस्य चंद्रकांत लोढाया, भरत सिनकर, निलेश कोटेचा, डॉ अमोल जाधव, संजय कोतकर, शिवाजी शिंदे,डॉ राहुल काटकर, डॉ अतुल पाटील, श्रीमती अरुणा उदावंत, ऋतुजा देशपांडे, चारू तेली,पिंकी जिनोदिया, चंद्रकांत पाटील, मनोज केसवानी,नितीन तायडे, ज्ञानेश्वर पाचोळे, भागवत पाटील, मानव सालोमन असे अनेक मान्यवरांसोबत तसेच भरपूर जनसमुदाय होता. पथनाट्य बसविन्यासाठी सौ विद्या कोतकर मॅडम यांनी मेहनत घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी अवयवदान संबंधी घोषणा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील सर यांनी केले. याप्रसंगी 3 महिला समवेत 4 पुरुषांनी संपूर्ण अवयवदान तर 10 व्यक्तींनी आंशिक अवयवदान याचा संकल्प केला. रोटरीच्या अश्या या नावीन्यपुर्ण कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

















Leave a Reply