परिवर्तनात तरूणांची भूमिका महत्वाची – वैशालीताई सुर्यवंशी, युवासेनेच्या मेळाव्यात निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन
भडगाव : येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणूक होत असून यात मतदारसंघात परिवर्तन अटळ असून यात युवकांची भूमिका महत्वाची राहणार असल्याचे प्रतिपादन वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले. त्या येथे आयोजीत करण्यात आलेल्या युवासेनेच्या मेळाव्यात बोलत होत्या.मुंबई येथील युवासेनेचे पदाधिकारी सिध्देश शिंदे, दिपक दाते, प्रियंका जोशी, स्वप्ना चौधरी, व प्रवीण चव्हाण हे जिल्हा दौऱ्यावर आले असून आज त्यांच्या उपस्थितीत भडगावात युवासेनेच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी विराज कावडिया, भूषण मुलाणे, निलेश चौधरी आदी युवासेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची देखील उपस्थिती होती. या प्रसंगी विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून आगामी निवडणुकीबाबत भाष्य केले. वैशालीताई सुर्यवंशी यांनी देखील आपल्या मनोगतात विधानसभा निवडणुकीसाठी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन केले. प्रचारापासून ते बुथपर्यंत तरूण हेच महत्वाची भूमिका पार पाडत असल्याने यासाठी युवासैनिकांनी आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला. पाचोरा-भडगाव मतदारसंघात परिवर्तन अटळ असून यात तरूणाईची भूमिका महत्वाची राहणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी आवर्जून नमूद केले. या कार्यक्रमाला जिल्हा सहसंपर्क प्रमुख सुनील पाटील, गणेश परदेशी, दिपक पाटील, अरूण पाटील, मनोहर चौधरी, गोरख पाटील, विजय साळुंखे, प्रवीण पाटील, दत्तू मांडोळे, राजू वाडे, रतन परदेशी, शशी पाटील, चेतन पाटील, चेतन रंगराव पाटील, माधव जगताप, यश बिरारी, सुशील महाजन, रितेश महाजन, संदीप ठाकरे, सागर पाटील, हितेश मारवाडी, मनोज पाटील, सौरव चावरे, प्रथमेश पाटील, उमेश पाटील, करण राजपूत, भावेश अहिरे, सुदर्शन बाविस्कर, रोनक बाविस्कर, तुषार देसले, कुंदन कुंभार, अर्जुन चव्हाण, प्रेम पाटील, सलमान मिर्झा, नवल राजपूत, योगेश भोई, सौरभ पाटील, विजय पाटील, अजय पाटील, रोहन पाटील, नरेंद्रसिंग सुर्यवंशी, वरद मोरे, देवेंद्र अहिरे, सतीश बिर्ला, योजना पाटील, मनीषा पाटील, मिनाक्षी पाटील, उषा परदेशी, सिंधू पाटील, बेबा पाटील, पुष्पा परदेशी, जयेश पाटील, देवेंद्र पाटील, नितेश पाटील, यश पाटील, प्रशांत पाटील, मनोज चौधरी यांच्यासह शिवसेना-उबाठा, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.