आस्था सामाजिक संस्थेने फुटपातावरील गोरगरिबांना ब्लॅंकेटचे वाटप करून दिली मायेची ऊब
सोलापूर प्रतिनिधी संतोष दलभंजन

सोलापूर नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली असता सामाजिक संस्थेनी अन्नदानाबरोबरच इतर सामाजिक उपक्रमात नेहमी सहभागी असते सध्या देशात वाढत असलेल्या थंडीची चाहूल लक्षात घेऊन फुटपाथ वरील वंचित बेगर निराधार अनाथ यांना १०० ब्लॅंकेट चे वाटप करून त्यांना मायेची ऊब दिले त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातील कौतुक होत आहे.
थोडक्यात थंडीमध्ये घरातील व्यक्ती रूम फिटर पांघरून घेऊन झोपतात परंतु उत्पातावरील नागरिकांना कशाचा आधार नसतो या सामाजिक जाणिवेतून आस्था सामाजिक संस्थेने ब्लॅंकेट चे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

आस्था सामाजिक संस्थेला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अध्यक्षिका भाग्यश्री जाधव मॅडम व तसेच पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील सिताराम महाराज साखर कारखान्याच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राज्यलक्ष्मी गायकवाड यांच्यामार्फत 100 ब्लॅंकेट पुरवण्यात आले होते. आपणही या पद्धतीने आस्था सामाजिक संस्थेला मदत करून सामाजिक कार्यात महत्त्वाचे योगदान देता येते.
या ब्लॅंकेट वाटपाच्या प्रसंगी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी, सचिव शिवानंद सावळगी प्रसिद्धी प्रमुख सुहास छंचुरे, संचालक देविदास चेळेकर संचालक योगेश कुंदुर, सचिन कुलकर्णी, गणेश साखरे, चंद्रकांत मिराखोर पिंटू कस्तुरे,सुरज छंचुरे, उपस्थित होते


















Leave a Reply